८५ हजाराचा गावठी दारूसाठा जप्त

By Admin | Updated: July 6, 2015 02:19 IST2015-07-06T02:19:30+5:302015-07-06T02:19:30+5:30

दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८५ हजार रुपयाचा गावठी दारूसाठा जप्त केला. सदर कारवाई गणेशपूर पारधी बेड्यावर रविवारी समुद्रपूर पोलिसांनी केली.

85 thousand crores of dowry seized | ८५ हजाराचा गावठी दारूसाठा जप्त

८५ हजाराचा गावठी दारूसाठा जप्त

समुद्रपूर : दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८५ हजार रुपयाचा गावठी दारूसाठा जप्त केला. सदर कारवाई गणेशपूर पारधी बेड्यावर रविवारी समुद्रपूर पोलिसांनी केली.
ठाणेदार रणजितसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिसांनी गणेशपूर पारधी बेड्यावर रविवारी सकाळी धाड टाकली. यामध्ये ४० लीटर मोहा दारू, किमत ४ हजार २०० रुपये, ७ ड्रममध्ये ७०० लिटर सडवा, किंमत ३५ हजार व ड्रम असा एकूण ४० हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. यामध्ये नलिनी नागमणी पवार (४५) रा. गणेशपूर हीला अटक केली. तसेच दुसऱ्या कारवाईत लोखंडी ड्रममध्ये ८०० लिटर सडवा किंमत ४१ हजार ६०० रुपये व ३० लिटर मोहा दारू साठा किमत ३ हजार २०० रुपये असा एकूण ४४ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करून तो नष्ट केला. यात उमाबाई अरविंद पवार (५०) रा. गणेशपूर हिला अटक केली.
सदर कारवाई ठाणेदारांच्या मार्गदर्शनात उमेश हरणखेडे, अजय अवचट, प्रकाश मैद, यशवंत गोल्हर, रवी वानखेडे, अनिल राऊत, राजू जयसिंगपूरे, विलास बालपांडे, शेखर नेहारे इत्यादींनी केली. सध्या मुंबई येथे गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यूमुळे राज्यभर गावठी दारूसाठा नष्ट करण्याची मोहीम छेडण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 85 thousand crores of dowry seized