७९ गावांत फवारणी
By Admin | Updated: September 20, 2014 23:55 IST2014-09-20T23:55:02+5:302014-09-20T23:55:02+5:30
जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.

७९ गावांत फवारणी
वर्धा : जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. यात मलेरीया विभागाच्यावतीने ७९ गावांत फवारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून या आजारावर प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १४२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय डेंग्यूचे १०२ रुग्ण असल्याचे तपासणीत समोर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मलेरियाच्या फवारणीतून डासांवर प्रतिबंध लाावण्याचा प्रशासनाचा उद्देश आाहे. मात्र यातून हे साध्य होणे शक्य नाही. यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात वाढत्या रोगाच्या प्रतिबंधावर आळा घालण्याकरिता २४ आरोग्य केंद्रांतर्गत ७९ गावात फवारणीचे काम सुरू आहे. या गावांंची लोकसंख्या ७५ हजार ४६४ आहे.
ज्या भागात फवारणी करण्यात येत आहे त्या गावात या रागाचे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. याच कारणाने या गावात ही फवारणी सुरू आहे. या फवारणीचा लाभ जिल्ह्यात हिवताप पसरविणाऱ्या डासांवर होणार आहे. हिवतापावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याकरिता कर्मचाऱ्यांच्या पाच चमू कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या तुलनेत हिवतापाचे रुग्ण कमी आहेत. मात्र याचा त्रास त्यांना कमी होण्याकरिता ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)