७५३ रुग्णांच्या तपासणीत ३६ संशयित कुष्ठरुग्ण
By Admin | Updated: February 3, 2015 23:01 IST2015-02-03T23:01:16+5:302015-02-03T23:01:16+5:30
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रोगनिदान शिबिरांच्या माध्यमातून कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी ७५३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात त्वचाविकाराचे ३६ संशयित रूग्ण आढळले.

७५३ रुग्णांच्या तपासणीत ३६ संशयित कुष्ठरुग्ण
वर्धा : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रोगनिदान शिबिरांच्या माध्यमातून कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यात येत आहे. यावेळी ७५३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात त्वचाविकाराचे ३६ संशयित रूग्ण आढळले.
कुष्ठरोग शोध मोहिमेत जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य सेवा कुष्ठरोग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग निवारण मोहिमेचा शुभारंभ सेवाग्राम येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला.
कुष्ठरोग निर्मूलन व शोध मोहिमेत जनतेलाही सहभागी मुनगंटीवार यांनी केले. १५ फेबु्रवारी पर्यंत ग्रामीण व शहरी भागात जनजागृती अभियान राबवून कुष्ठरोग असलेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांचेवर तात्काळ उपचार सुरू करा. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे जनजागृतीचा भाग म्हणून जिल्हा स्तरावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. चव्हाण व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी हिरवी झेंडी दाखविली. तालुका स्तरावर मोहिमेचे जनजागरण म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले. १५ फेब्रुवारी पर्यंत शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मेळावा, बचत गट, हायस्कूलमध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, बाजार व बसस्थानक, रेल्वे स्टेशन प्रदर्शन, अंगणवाडी भेट, शासकीय कार्यालय भेट, शाळा व आश्रम शाळा भेट इत्यादी प्रकारे जनजागरण करण्यात येत आहे. यावेळी खासदार रामदास तडस, जि.प. अध्यक्ष चित्रा रननवरे, आ. समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, डॉ. कुचेवार आदी मान्यवर उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)