शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

७२ गावे पाणीदार करण्यासाठी लागले असंख्य हात

By admin | Updated: April 11, 2017 01:13 IST

जीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

ग्रामस्थांचा पुढाकार : अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्याराजेश भोजेकर वर्धाजीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही. उशिरा का होईना हेच पाणी वाचविण्यासाठी चळवळी उभ्या होत आहेत. याचाच प्रत्यय आर्वी तालुक्यातील तब्बल ७२ गावांमध्ये येत आहे. निमित्त आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या अभियानाचे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये हजारो हात निस्वार्थ भावनेने पाण्यासाठी श्रमदानात गुंतले आहे. हे दृश्य ‘साथी हात बढाना..एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना...’ या गीताचे स्मरण करून देत आहे. अभिनेते अमिर खान, सत्यमेव जयतेचे सत्यजीत भटकळ व डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अनुषंगाने मागील वर्षी वॉटर कॅप-१ स्पर्धेचे ३ तालुक्यात यशस्वी आयोजन केले. यंदा वॉटर कॅप-२ मध्ये जलसंधारणासाठी महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमधील २०१४ गावांची निवड झाली. गावातील ग्रामसभेत ठराव घेऊन या स्पर्धेत भाग घेतला आहे. या गावांतील प्रत्येकी पाच प्रतिनिधींना चार दिवसांचे प्रशिक्षण पाणी फांऊडेशनतर्फे ८४ केंद्रांवर देण्यात आले. त्यांच्या सल्ल्याने पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करून गावाच्या सर्व लोकांना सहभागी करुन श्रमदान व स्वावलंबनाने जलसंधारण कार्य सुरू आहे.आर्वी तालुक्यातील १३० पैकी ७२ गावांची निवडवर्धा : वॉटर कॅप-२ या स्पर्धेसाठी आर्वी तालुक्यातील १३० पैकी तब्बल ७२ गावांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला स्पर्धेमागील भूमिका या गावांना समजावून सांगण्यात अडचणी आल्या. ही केवळ स्पर्धा नाही, तर पाण्याचे महत्त्वही त्यांना समजाविण्यात आले. पाणी नसल्यामुळे आडातपाडात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भविष्यात कोरडा दुष्काळ कायमस्वरूपी पडला, तर पाणी पाणी करत जीवन संपेल, हे दिवस यायला वेळ लागणार नाही. ही गंभीर बाब या निमित्ताने गावकऱ्यांना समजाविण्यात यश आले. यानंतर आर्वी तालुक्यातील ७२ हा गावांतून असंख्य महिला-पुरुषांचे हात जलसंधारणाच्या कामाला लागली आहे. ही स्पर्धा असली तरी यामुळे ही गावे पाणीदार होणार आहे. हे लक्षात येताच काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. यामध्ये भारतीय जैन संघटना, जनहीत मंच, युवा सोशल फोरम या संघटनांसोबतच वर्धेतील हनुमान टेकडीवर जलसंधारणाचे ‘मॉडेल’ उभी करणारी वैद्यकीय जनजागृती मंच ही संघटनाही या कामात सरसावली आहे. माळेगाव (ठेका) येथे सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंकित जयस्वाल, प्रिया बाळसराफ, हर्षवर्धन बानोकर, हिमांशू लोहकरे विद्यार्थ्यांसह व गावातील काही युवकांनी गावकऱ्यांना या स्पर्धेचे महत्त्व पटवून देण्याची मोलाची कामगिरी बजावली. माळेगाव(ठेका) या गावात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या समाजोत्थनाच्या कार्यात या गावांना प्रत्येकी पाच दिवस जलसंधारणाच्या कार्यासाठी भारतीय जैन संघटना जेसीबी वा पोकलेन मशीन पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सहयोग करण्याचे आवाहनही भारतीय जैन संघटनेने केले आहे.अनेक संघटना सरसावणार८ एप्रिल ते २२ मे अशी ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झालेल्या आर्वी तालुक्यातील ७२ गावांना पाणीदार करण्यासाठी पुन्हा काही स्वयंसेवी व सामाजिक संघटना जुळणार असल्याचे बोलले जात आहे. श्रमदानातून दिवसागणिक असंख्य हात लागत असल्यामुळे आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये सुरू असलेल्या चळवळीला चांगलीच गती आली आहे.अन् जिल्हाधिकाऱ्यांनीही केले श्रमदानआर्वी तालुक्यातील माळेगाव(ठेका) या गावाचीही वॉटर कॅप-२ स्पर्धेसाठी निवड झाली. या गावांत श्रमदानात असंख्य हात लागले. या कामांची पाहणी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे सोमवारी सकाळीच पोहचले. प्रत्येकजण कामात गुंतला असल्याचे पाहून त्यांनाही राहवले नाही. त्यांनीही कुदळ घेत श्रमदान केले.