७२ हजार विद्यार्थ्यांनी दिली ग्रामगीता परीक्षा

By Admin | Updated: January 5, 2015 23:10 IST2015-01-05T23:10:17+5:302015-01-05T23:10:17+5:30

अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रमाद्वारे संपूर्ण देशात रविवारी ग्रामगीता परीक्षा घेण्यात आली़ यात ७२ हजार विद्यार्थी सहभागी झाले. स्थानिक ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात

72 thousand students gave Gramgita Examination | ७२ हजार विद्यार्थ्यांनी दिली ग्रामगीता परीक्षा

७२ हजार विद्यार्थ्यांनी दिली ग्रामगीता परीक्षा

साहुर : अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आश्रमाद्वारे संपूर्ण देशात रविवारी ग्रामगीता परीक्षा घेण्यात आली़ यात ७२ हजार विद्यार्थी सहभागी झाले. स्थानिक ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूदेव कार्याला वाहून घेतलेले केशव रामटेके यांनी २६ जानेवारी १९९० रोजी सर्वप्रथम ९०१ विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेला बसविले होते. २६ वर्षांच्या वाटचालीत विद्यार्थ्यांची संख्या ७२ हजारांवर पोहोचली आहे. या परीक्षेचे एकूण सहा टप्पे आहे़ प्रवेश, परिचय, प्रवीण, ग्रामनाथ, ग्रामगीतारत्न व ग्रामगीताचार्य अशी परीक्षांची नावे आहेत. रामकृष्णदादा बेलूरकर यांनी ही परीक्षा दिली नसली तरी त्यांचा अभ्यास व मुखोग्दत ग्रामगीता बघून संपूर्ण राज्यात त्यांना ग्रामगीताचार्य म्हणून संबोधले जाते. ग्रामगीताचार्य ही परीक्षा पीएचडी समकक्ष म्हणूनच गुरूदेव परिवारात ओळखली जाते.
आजपर्यंत ८ लाख ७९ हजार ८९० गुरूदेव सेवकांनी या परीक्षा दिल्या़ यात १४७ प्रचारक ग्रामगीताचार्य झाले असून त्यातील ९ जणांचा सेवाकार्यात मृत्यू झाला़ इतर ग्रामगीताचार्य गावोगावी जाऊन प्रबोधन करतात़ ग्रामगीताचार्य गुलाब खवसे हे सचिव झाल्यावर विशेष सुधारणा करण्यात आल्या़ परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सेवकांना सन्मानपत्र, ग्रामगीताचार्यांना विशेष पुरस्कार, स्मृतिचिन्ह शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले जाते़ येथील परीक्षेला प्रा. विनोद पेठे, दीपक खरडे, हरि टाकळकर, विजय तळहांडे, शरद वरकड, रमेशचंद्र सरोदे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: 72 thousand students gave Gramgita Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.