शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नात्याला काळिमा; वासनांध आजोबाचा चिमुरड्या नातीवर लैंगिक अत्याचार

By चैतन्य जोशी | Updated: August 26, 2022 12:25 IST

आरोपी आजोबाला माधरात्री अटक, घटनेने उडाली खळबळ

वर्धा : स्त्रिया आणि लहान मुलींवरीवरील लैंगिक अत्याचाराचे इतके गुन्हे उजेडात येत असतानाही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे धक्कादायक चित्र सातत्याने बघावयास मिळत आहे. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना वर्धा शहरत 25 रोजी रात्री उघड झाली आहे. याप्रकरणात  एका 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

रामनगर पोलिसांनी याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे  दीड वर्षांपासून राहत आहे. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या  मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

नराधम 70 वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली. रात्री उशिरा रामनगर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे दाखल झाले. हेमंत चांदेवार यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.आजी ओरडल्याने फुटले बिंग

वासनांध आजोबा त्याच्या खोलीत नातीसोबत दुष्कृत्य करताना दिसला. हे पाहून आजीने जोरजोरात आरडाओरडा केला. आजी ओरडल्याचे पाहून चिमुरडीच्या आईनेही खोलीकडे धाव घेतली आणि हे बिंग फुटले. चिमुरडीने घडलेला सर्व प्रकारच्या आईला सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणwardha-acवर्धा