शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

७० टक्के बालकांना पोलिओ लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:38 IST

आरोग्य विभागाने वरिष्ठांच्या सूचनेवरून रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ० ते ५ वर्षपर्यंतच्या जिल्ह्यातील ७० टक्के बालकांना पोलिओची लस दिली. जिल्ह्यातील १ हजार ३४० केंद्रावरून ३ हजार २६० कर्मचाऱ्यांसह २६९ पर्यवेक्षकांच्या सहकार्याने....

ठळक मुद्दे१ हजार ३४० केंद्र : ३ हजार २६० कर्मचाºयांसह २६९ पर्यवेक्षकांनी केले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाने वरिष्ठांच्या सूचनेवरून रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ० ते ५ वर्षपर्यंतच्या जिल्ह्यातील ७० टक्के बालकांना पोलिओची लस दिली. जिल्ह्यातील १ हजार ३४० केंद्रावरून ३ हजार २६० कर्मचाऱ्यांसह २६९ पर्यवेक्षकांच्या सहकार्याने १ लाख १६ हजार ६ बालकांपैकी ७० टक्के बालकांना दुपारपर्यंत पोलिओ लस दिली. सायंकाळी उशीरापर्यंत लस देण्याची प्रक्रिया सुरू होती.पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील, डॉ. मंगेश रेवतकर, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ६ बालकांना एकाच दिवशी पोलिओची लस कशी पाजता येईल यासाठी रविवारी प्रयत्न करण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यंत उद्दीष्टापैकी ७० टक्के बालकांना पोलिओची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली. रविवारी राबविलेल्या मोहिमेत जे बालक लस पासून वंचित राहिले असतील त्यांचा शोध घेऊन त्यांनाही लस देण्यात येणार असल्याचे डॉ. अजय डवले यांनी सांगितले.वीट भट्टीवर काम करणाऱ्यांसह ऊस तोडणाऱ्यांच्या मुलांनाही पाजला डोजजिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८४,८४५ व शहरी भागातील ३१,१६१ असे एकूण १ लाख १६ हजार ६ चिमुकल्यांना पोलिओची लस देण्याचे उद्दीष्ट होते. शिवाय टोल नाके, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८६ ट्रान्झीट चमू तर ९३ मोबाईल टिम्सद्वारे विट भट्या व ऊस तोडणारे कामगारांच्या बालकांना लस पाजण्यात आली.सरपंचाच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभआंजी (मोठी) - येथील आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ सरपंच जगदीश संचेरीया यांनी चिमुकल्याला लस पाजून केला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादूरे, आरोग्य सेवक गणेश पवार, शंभरकर, चौधरी, ढबले आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना डॉ. बहादूरे यांनी पोलिओ लस बालकांसाठी कशी फायद्याची आहे, याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेकरिता आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.