कारसह ६.८७ लाखांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: May 11, 2017 00:45 IST2017-05-11T00:45:04+5:302017-05-11T00:45:04+5:30
कारमध्ये दारूसाठा वाहून नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून हिंगणघाट

कारसह ६.८७ लाखांचा दारूसाठा जप्त
गुन्हे शाखेची कारवाई : हिंगणघाट येथे नाकाबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : कारमध्ये दारूसाठा वाहून नेला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून हिंगणघाट येथे सापळा रचत कारसह दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
एका सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये देशी, विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून हिंगणघाट येथे पेट्रोलपंपाजवळ नाकाबंदी करण्यात आली. सदर वाहन शिताफीने अडविण्यात आले. यातील पंकज दिलीपराव काळे (२४) रा. ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी, विदेशी दारू आणि बिअर जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने वाहन क्र. एमएच ०१ पीए ७४६८ सह ६ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरूद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशानुसार सहायक फोजदार अशोक साबळे, पोलीस हवालदार राजेंद्र ठाकूर, शिपाई स्वप्नील भारद्वाज यांनी केली.