जिल्ह्यात 6.75 लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची झाली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:12+5:30

जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हजार ८५६.८५ क्विंटल, सीसीआयने १२ हजार ४३१ शेतकऱ्यांकडून २ लाख ५९ हजार ३५६.२२ क्विंटल, बाजार समिती अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी २६ हजार ८२६ शेतकऱ्यांकडून ३ लाख ८४ हजार ४८.७४ क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

6.75 lakh quintals of white gold was procured in the district | जिल्ह्यात 6.75 लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची झाली खरेदी

जिल्ह्यात 6.75 लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची झाली खरेदी

ठळक मुद्देसीसीआयचे सहा तर पणनचे चार केंद्र : गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटले

  लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील ४० हजार ८४८ शेतकऱ्यांकडून ६ लाख ७५ हजार २६१.८१ क्विंटल कापसाची खरेदी शासनाने तसेच खासगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत केली आहे.
जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हजार ८५६.८५ क्विंटल, सीसीआयने १२ हजार ४३१ शेतकऱ्यांकडून २ लाख ५९ हजार ३५६.२२ क्विंटल, बाजार समिती अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी २६ हजार ८२६ शेतकऱ्यांकडून ३ लाख ८४ हजार ४८.७४ क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

६५,०३१ शेतकऱ्यांची केली होती नोंदणी
सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस देण्यासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी १४ हजार २२ शेतकऱ्यांकडील २ लाख ९१ हजार २१३.०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

कापूस उत्पादकांचा शेतमाल विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे वाढतोय कल
चांगल्या प्रतीच्या कापसाला खासगी व्यापारी ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव देत आहेत. तर सीसीआय ५ हजार ७०० रुपये भाव कापसाला देत आहे. दोघांच्या भावात जास्त तफावत नसल्याने सध्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापूस देण्यास प्राधान्यक्रम देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज चूकला  होता.

Web Title: 6.75 lakh quintals of white gold was procured in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस