व्यावसायिक शिबिरात ६० शेतकऱ्यांचा सहभाग
By Admin | Updated: February 8, 2015 23:37 IST2015-02-08T23:37:56+5:302015-02-08T23:37:56+5:30
डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर सोमवारपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताहास प्रारंभ झाला़ कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन

व्यावसायिक शिबिरात ६० शेतकऱ्यांचा सहभाग
वर्धा : डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर सोमवारपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताहास प्रारंभ झाला़ कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान विषयावर तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले़ यात जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़ सेलू, वर्धा, देवळी या तालुक्यातील विविध गावांतून शेतकरी हजर झाले़
तीन दिवसीय शेतकरी व्यावसायिक प्रशिक्षणाचे उद्घाटन महात्मा गांधी ग्रामीण औद्यौगिकरण संस्थेचे संचालक डॉ़ प्रफुल्ल काळे यांच्या हस्ते पार पडले़ अध्यक्षस्थानी डॉ़ सुरेश नेमाडे तर अतिथी म्हणून चंद्रकांत मोहरकर, पूजा मोहरकर, माजी प्राचार्य रेखा ठाकरे आदी उपस्थित होते़ प्रशिक्षण संयोजक म्हणून विषय विशेषज्ञ उज्वला सिरसाट होत्या़ प्रशिक्षणात पूजा मोहरकर यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी कानमंत्र विषयावर मार्गदर्शन केले़ प्रशिक्षणार्थीना एमआयडीसी स्थित सोयाबीन प्रक्रिया युनिटवर भेट देत पाहणी करता आली़ प्रा़ ठाकरे यांनी सोयाबीनचे महत्त्व, त्यातील पोषक घटक व अन्नमूल्य तसेच सोयाबीनपासून प्रक्रिया पदार्थावर सोयाबीन, दाळ, सोयादुध, आटा, पनीर, नटस, कॉफी शिरा आदी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले़ डॉ़ सुरेश नेमाडे यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर मुल्यवर्धीत प्रक्रिया उद्योग उभारणी तसेच उच्चत्तम प्रथिनेयुक्त सोयाअन्न निर्मिती व प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी कुटुंबांत सोयायुक्त आहाराचा समावेश होईल, ही अपेक्षा व्यक्त केली़ प्रशिक्षणार्थींना कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त ११ फेबु्रवारीपर्यंत आयोजित भरडधान्य ज्वारी प्रक्रिया तंत्रज्ञान विषयावरील व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली़ समारोपाला अशोक अडेकार, नितीन ठाकरे, रमेश ढोकणे उपस्थित होते़ संचालन प्रा़ सिरसाट यांनी केले तर आभार डॉ़ दवने यांनी मानले़(कार्यालय प्रतिनिधी)