५७ शाळा प्रगत व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:47 IST2017-09-14T00:47:26+5:302017-09-14T00:47:43+5:30
जिल्ह्यातील शासकीय प्रत्येक शाळा प्रगत शाळा म्हणूनच संबोधीली गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांसह संबंधीतांकडून प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे.

५७ शाळा प्रगत व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शासकीय प्रत्येक शाळा प्रगत शाळा म्हणूनच संबोधीली गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांसह संबंधीतांकडून प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. ५७ शाळा प्रगत शाळा व्हाव्या यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांनी केले.
जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) व डीआयईसीपीडी वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. तसेच न. प.च्या अप्रगत शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोेलत होत्या. व्यासपीठावर डॉ. रेखा महाजन, भंडारा जिल्हयातील खराशी शाळेचे मुख्याध्यपक मुबारक सय्यद, रत्नमाला खडके, औढेकर, पुसदकर, डॉ. वाल्मिक इंगोले, सुरेश हजारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जि. प. प्राथमिक शाळा सुलतानपूर पं.स. हिंगणघाट येथील विद्यार्थिनी सुहानी भगत हिने चला प्रगत होऊया हे नाट्य सादर केले. यावेळी मुबारक सय्यद यांनी मोचक्या शब्दात स्वत: च्या शाळेत केलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच अनुभव कथन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रगत आठ शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची यशोगाथा व शाळा प्रगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वर्धा पं. स. मधून प्राथमिक शाळा तळेगाव (टालाटूले)चे चंद्रशेखर वैद्य, देवळीतून प्राथमिक शाळा आगरगाव पारधीतांडाचे संजय भोसले, सेलू पं.स. मधून उच्च प्राथमिक शाळा वाहीतपूरचे देवेंद्र गाठे, हिंगणघाट पं.स.मधुन प्रा.शा.सुलतानपूरच्या शुभांगी वासनिक, पं.स. समुद्रपूर प्रा. शा. तावीचे चितेश्वर ढोले, पं.स.आर्वी मधुन प्रा.शा. पिंपळखुटाचे राहुल राजनेकर, पं.स. आष्टी प्रा.शा.गोदावरीचे हिवसे, पं. स. कारंजा प्रा.शा. कुंडीचे मादरपल्ले यांनी प्रगत शाळेची माहिती दिली. १० शाळा आयएसओ केल्या बद्दल केंद्र प्रमुख वसंत खोडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सदर कार्यशाळेला गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, ५७ अप्रगत शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला शुभांगी मेश्राम व विजय झिले यांनी सहकार्य केले.