शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

सूतयज्ञात ५६० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:33 IST

४ जानेवारी २०१९ ला कुमारप्पा जयंतीच्या निमित्ताने यावर्षी सूतकताई प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी मगन संग्रहालयच्या वतीने वस्त्रस्वावलंबन उपक्रमाअंतर्गत सूतयज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देवस्त्रस्वावलंबन उपक्रम : जे. सी. कुमारप्पा जयंतीनिमित्त मगन संग्रहालय समितीतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ४ जानेवारी २०१९ ला कुमारप्पा जयंतीच्या निमित्ताने यावर्षी सूतकताई प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी मगन संग्रहालयच्या वतीने वस्त्रस्वावलंबन उपक्रमाअंतर्गत सूतयज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.महात्मा गांधी, विनोबा व कुमारप्पा यांच्या स्वर्णीम, अस्तित्वाचे वलय प्राप्त असणाऱ्या मगन संग्रहालयचा स्थापना दिन सूतयज्ञ या वस्त्रस्वावलंबनाच्या गांधींच्या वारसा तत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधींनी ३० डिसेंबर १९३८ ला मनगसंग्रहालय प्रदर्शनाचे स्वत: उद्घाटन केले होते. खादी व ग्रामोद्योग एकमेव संग्रहालय म्हणून भारतात हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय ओळखले जाते. गांधींच्या तत्त्वांचा अमूल्य वारसा जपण्यासाठी व अमलात आणण्यासाठी मनगसंग्रहालयद्वारे २०१२-१३ पासून ‘टकळीवर सूतकताई’ हा उपक्रम जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अशा एकूण १४ शाळांमध्ये राबविला जातो. गेल्या चार वर्षांत एकूण २,२५६ विद्यार्थी आजपर्यंत सूत कातण्यात प्रशिक्षित करण्यात आले. या चार वर्षांत ३ हजारांच्यावर टकळी विद्यार्थ्यांना देऊन ४,५०० ते ५,००० वेळू व त्याचा आजपर्यंत १७ ते २० मी. कापड तयार करण्यात आला आहे. वस्त्रस्वावलंबन हे गांधींनी अंगिकरलेले तत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रूजावे तसेच हातांनी नवनिर्माण करण्याची क्षमता व श्रमप्रतिष्ठा व वस्त्रस्वावलंबन प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या अंगी यावी हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.‘गांधी १५०’ या जयंती वर्षाला हा उपक्रम जोडण्यात आल्यामुळे २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत होणाऱ्या ‘सूतयज्ञ’ या कार्यक्रमात किमान १५०० विद्यार्थी एकत्रित सूतकताई करून सूतयज्ञ साजरा होईल. ही खऱ्या अर्थाने गांधींच्या कार्याला श्रद्धांजली असेल. ज्यात शहरातील वर्धा कन्या विद्यालय, केसरीमल, रत्नीबाई, सुशील हिंमतसिंगका, लोकविद्यालय, नेहरू विद्यालय नगरपरिषद, वर्धा ग्रामीण शाळांमध्ये, यशवंत विद्यालय सेलू, हिंगणी, दीपचंद विद्यालय, विवेक विद्यालय मांडवा, गुरूकुल विद्यानिकेतन देवळी, आदर्श विद्यालय, गर्ल्स हायस्कूल आंजी ५० शाळा सहभागी झाल्या.कार्यक्रमाला गांधी सेवासंघाचे कनकमल गांधी, संग्रहालयाच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता, शिक्षणाधिकारी मेश्राम, डॉ. उल्हास जाजू, करूणा फुटाणे आदी उपस्थित होते. गांधी यांनी सूतकताईचे वैशिट्य विशद केले तर डॉ. गुप्तांनी सूतकताई करून स्वत: स्वत:च कापड तयार करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन सुषमा सोनटक्के यांनी केले.