अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:48 AM2018-01-02T09:48:03+5:302018-01-02T09:48:43+5:30

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा (सिल्व्हर कार्प) मासा सापडला. धरणात पाणी भरल्यानंतर एवढा मोठा मासा प्रथमच मासेमारांच्या जाळ्यात अडकला आहे.

52 kg fish found in Upper Wardha dam | अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा

अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भातील धरणात प्रथमच आढळला

आॅनलाईन लोकमत
अमरावती : अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा (सिल्व्हर कार्प) मासा सापडला. धरणात पाणी भरल्यानंतर एवढा मोठा मासा प्रथमच मासेमारांच्या जाळ्यात अडकला आहे.
मोर्शी नजीकच्या नल-दमयंती सागर जलाशयात (अप्पर वर्धा धरण) मासेमारीचे कंत्राट वरूड तालुक्यातील राजुराबाजार येथील नल-दमयंती सागर मच्छिमार सहकारी संस्थेने घेतले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणावर मासेमारी करणारे पलांदूर येथील यशवंत, गुलाब व सुरेश मेश्राम यांच्यासह गोपी कांबळे हे सोमवारी सकाळी मासेमारीसाठी धरणात उतरले होते. त्यांच्या जाळ्यात हा मासा अडकला.
अमरावती विभागातील दुसरे सर्वात मोठे जलाशय असलेले अप्पर वर्धा धरण मासेमारांसाठी मिळकतीच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते, असे यावेळी मासेमारी संघटनेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे यांनी सांगितले.
सिल्व्हर कार्प या माश्याची प्रतिवर्ष पाच किलो याप्रमाणे वाढ होते. तो पाच ते सहा वर्षांचा असावा, असा अंदाज लावण्यात आला आहे.

मासेमारांसाठी नंदनवन
नल-दमयंतीसागर जलाशय मासेमारीसाठी नंदनवन ठरू लागला आहे. या जलाशयात दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील व विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मासेमार रोजगारासाठी आले आहेत. मासेमार संघात सध्या ५५० मासेमार असून, जलाशयात सुमारे ११०० मासेमार रोजगार मिळवू शकतात. धरणात विविध प्रजातींची बिजे टाकण्यात आली आहेत.

Web Title: 52 kg fish found in Upper Wardha dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण