५१ शिक्षकांचे रक्तदान
By Admin | Updated: October 5, 2015 02:18 IST2015-10-05T02:18:36+5:302015-10-05T02:18:36+5:30
पंचायत समिती वर्धा सभागृहात शनिवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ शिक्षकांनी रक्तदान केले.

५१ शिक्षकांचे रक्तदान
रक्तदान शिबिरातून दिला सामाजिकतेचा परिचय
वर्धा : पंचायत समिती वर्धा सभागृहात शनिवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ शिक्षकांनी रक्तदान केले. यात धनराज तायडे व सुरेश हजारे या विस्तार अधिकाऱ्यांचा सहभाग होता. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपिठावर अध्यक्ष म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे होते. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत सपकाळे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. किरण धांडे, गट शिक्षणाधिकारी अशोक कोडापे, विस्तार अधिकारी सुरेश हजारे, शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीचे निमंत्रित सदस्य विजय कोंबे, समितीचे नागपूर विभाग प्रमुख नरेश गेडे, राज्य संघटक महेंद्र भुते, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर, जिल्हा सरचिटणीस रामदास खेकारे, जिल्हा कार्याध्यक्ष अजय काकडे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर डाखोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा, देवळी आणि सेलू तालुका शाखेच्या संयुक्त आयोजनातून गत दहा वर्षापासून रक्तदान शिबिर घेण्यात येते. यावेळी संजय मीणा म्हणाले, समाजाला अशा शिबिराची गरज आहे. यामुळे गरजुंना वेळेवर मदत करता येऊ शकते.
यानंतर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यात खो-खो खेळासाठी उत्कृष्ट खेळाडू घडविणारे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक प्रदीप मनोहर देशमुख, शेतकरी आत्महत्या कारणे आणि उपाययोजना यावर संशोाधन करून आचार्य पदवी संपादन करणारे कोलगाव पंचायत समिती, सेलू येथील सहाय्यक शिक्षक डॉ. संदीप जवंजाळ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच समाज सहभागाच्या माध्यमातून शाळेला भौतिक सुविधा निर्माण करून देणारे उपक्रमशील शिक्षक गिरीश बोकडे यांचा समावेश होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांचे हस्ते सन्मान चिन्ह व विद्रोही तुकाराम हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा विभाग प्रमुख सुनील वाघ यांनी केले. शिक्षक समितीच्या विविध उपक्रमांची माहिती कोंबे यांनी दिली. संचालन अजय मोरे यांनी तर जिल्हा संघटिका उषा तळवेकर यांनी आभार मानले. शिबिराला अतुल बाळसराफ, सुधाकर चौधरी, सुदेश खोब्रागडे, मनीष ठाकरे, गजानन फटिंग, गुणवंत बारहाते, मनोज भेंडे, अनिल शंभरकर, अरुण राऊत, विजय मेंढेवार, अतुल तळवेकर, प्रकाश तिखे, सुरेश बोरघरे, रूपसिंग राठोड, शिवहरी मानकर आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)