आणेवारी ५० पैशांवर; शेतकऱ्यांची थट्टा

By Admin | Updated: November 22, 2014 23:07 IST2014-11-22T23:07:44+5:302014-11-22T23:07:44+5:30

तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत

On the 50th day; Joke of farmers | आणेवारी ५० पैशांवर; शेतकऱ्यांची थट्टा

आणेवारी ५० पैशांवर; शेतकऱ्यांची थट्टा

कपाशी करपली : सोयाबीनचा उतारा एक एक पोते
कारंजा (घा़) : तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत वा नशेत तर हा अहवाल तयार केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ ही आणेवारी शेतकऱ्यांची थट्टा करणारीच असल्याचे दिसते़
तालुक्यात ६० गावे असून पेरणीयोग्य ४२ हजार ५०० हेक्टर जमीन आहे़ यात २४ हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार ५०० हेक्टरमध्ये कापूस व उर्वरित जमिनीत मुंग, उडीद व अन्य पिके आहे़ पाऊस ७३० मिली झाला़ पावसाला विलंब झाल्याने सोयाबीनची पेरणीही उशीरा झाली़ बियाण्यांची उगवण क्षमताही कमी होती़ पेरणीनंतर पावसाने खंड दिला़ नंतर सतत पाऊस आला़ सोयाबीन ऐन फुलावर असताना तांबेरा रोग आला़ सततचा पाऊस व तांबेरा यामुळे सोयाबीन बुडाले़ काही शेतकऱ्यांनी तर वाढलेल्या मजुरीमुळे सोयाबीनची कापणीही केली नाही़ हेक्टरी तीन पोते सोयाबीनचा उतारा आला़ कपाशी, ज्वारी व तुरीची अवस्थाही जवळपास अशीच आहे़ कपाशीवर चुरडा पडला, ज्वारीवर तांबेरा तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण झाल्याने पाने गळून पडत आहे़ कपाशीची बोंडे व पात्या कोमेजून खाली गळत आहे़ एकरी २ क्विंटल कापूस होईल की नाही, हे सांगणे कठिण आहे़ वीज पुरवठा पुरेसा नाही़ तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहे़ विहिरीची पातळी खोल गेली़ नाले कोरडे होत आहे़ खैरी धरण असूनही मोजक्या १० ते १२ गावांना सिंचनाची सोय होते़ एकही बारमाही वाहणारी नदी नाही़ यामुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट गडद होताना दिसतात़

Web Title: On the 50th day; Joke of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.