५०० रूपयांची लाच घेताना अटक
By Admin | Updated: December 10, 2015 02:17 IST2015-12-10T02:17:54+5:302015-12-10T02:17:54+5:30
आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढून देण्याकरिता ५०० रूपयांची लाच मागणाऱ्या उपअभियंता कार्यालयातील ....

५०० रूपयांची लाच घेताना अटक
वर्धा : आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढून देण्याकरिता ५०० रूपयांची लाच मागणाऱ्या उपअभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास वार्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सचिन जनार्दन नवरंगे (३०) कनिष्ठ लिपीक, उपअभियंता कार्यालय, यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळा, उपविभाग वर्धा असे लाच मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, तक्रारदार हे यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेतूनच २०१३ साली सेवानिवृत्त झाले होते. आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढण्यासाठी ते विभागात गेले असता त्यांना सचिनने ५०० रुपयांची केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. यांतर्गत सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपतचे नागपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक स्वप्नील धुळे, पोेलीस निरीक्षक अनिरूद्ध पुरी, कुणाल डांगे, रोशन निबुळकर, पल्लवी बोबडे, यांनी केली. नवरंगे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(शहर प्रतिनिधी)