शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५०० शेतकऱ्यांना होणार सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:10 IST

जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. 

ठळक मुद्देदहेगाव (गोंडी) कालवा दुरुस्तीचे काम सुरू :•६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या दहेगाव गोंडी येथील तलावाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे  काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले असून यामुळे ६०० हेक्टर सिंचनक्षमता पुनर्स्थापित होणार आहे. तसेच ४ गावांतील ५०० शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होईल. दहेगाव गोंडी येथे लघुसिंचन तलाव आहे. या तलावातून सिंचनासाठी ७ किलोमीटरचा मुख्य कालवा, तसेच ५.२० किलोमीटरचा एक  आणि दीड किलोमीटरचे २ असे तीन लघुकालवे आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून कालव्यांच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये झाडे वाढली होती. मातीने कालवे बुजले होते. परिणामी, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नव्हते.  त्यामुळे तलावातून अपेक्षित सिंचन होऊ शकत नव्हते. मागील ५ वर्षांत या तलावातून केवळ ८० हेक्टर सिंचन झाले आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी   गावकºयांकडून वारंवार केली जात  होती. कालव्याची दुरुस्ती आणि गाळ उपसण्याचे काम  जलयुक्त शिवारमधून करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेऊन प्रस्तावाला मंजुरी दिली.दहेगाव गोंडी  येथील तलावाच्या  कालव्याचे दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारमधून सुरू करण्यात आले. या कालव्याच्या दुरुस्तीमुळे काचनूर, खरांगणा, कासारखेडा, मासोद या गावातील सुमारे ५०० शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करावी आणि त्यासाठी अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच गुरे असणाºया  शेतकऱ्यांनी चा-यासाठी मक्याची लागवड करावी. कालव्याचे काम १५ दिवसांत पूर्ण होऊन  चारा लागवडीसाठीसुद्धा तलावाच्या पाण्याचा वापर करता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी तत्काळ मागणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. अशा पद्धतीच्या कालवा दुरुस्ती कामाचे प्रस्ताव कुऱ्हा, टेंभरी, हराशी या गावांसाठीसुद्धा तयार केले आहेत. त्याला मान्यता मिळाल्यावर तेथील कामसुद्धा सुरू करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता काळे आणि आवीर्चे उपअभियंता राजीव दामोधरे यांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी