शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

५० फूट लांबीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 9:50 PM

अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात शनिवारी ३५ मागण्यांचा समावेश असलेले ५० फुट लांबीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवकांची धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात शनिवारी ३५ मागण्यांचा समावेश असलेले ५० फुट लांबीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. सदर निवेदन देण्याकरिता अंगणवाडी सेविकांनी रेल्वे स्थानकासमोरून मोर्चा काढला. शहरातून निघालेल्या या मोर्चात असलेले एवढे मोठे निवेदन पाहून शहरातील नागरिकही अवाक् झाले.जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या या निवेदनात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाºया कर्मचाºयांना शासनाच्या इतर कर्मचाºयांप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे. सोबतच डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची हत्या करणारे अद्यापही मोकाट असून त्यांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे त्यांना दिलासा देण्याकरिता देण्याकरिता कुठलीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी देवून शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, शेतकरी हितार्थ असलेला स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, शिक्षणाचे होणारे बाजारीकरण थांबविण्यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलावे तसेच ओबीसी, एससी, एनटी यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ द्यावा. केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे. विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनासाठी भरीव अनुदानाची तरतूद करावी. जीएसटी कायद्यात सुधारणा करावी. आदी मागण्यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाचे नेतृत्त्व आयटकचे राज्यसचिव दिलीप उटाणे, जिल्हासंघटक असलम पठाण यांनी केले. मोर्चा दुपारी २ वाजताच्या सुमारास न्यायालयाच्या मुख्यद्वारासमोर आला असता पोलिसांनी तो अडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ५० फुट लांबीचे ३५ मागण्यांचा समावेश असलेले निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.मोर्चात मोहन पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, सुरेश गोसावी, गुणवंत डकरे, ज्ञानेश्वरी डंभारे, मैना उईके, मंगला इंगोले, विमल कौरती, सुनंदा आखाडे, शोभा तिवारी, रेखा कातोडे, नलीनी चौधरी, माला भगत, शोभा सायंकार, यमुना नगराळे, रमेश बोंदरकर, वैशाली नंदरे यांच्यासह अंगणवाडी आणि आशा सेविकांचा सहभाग होता.निवेदन पाहून अनेक अवाक्आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार हे निवेदन रस्त्याने घेवून अंगणवाडी सेविका निघाल्या असता ते पाहून शहरातील नागरिक अवाक् झाले. निवेदन स्वीकारतानाही निवासी जिल्हाधिकाºयांनी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.