४९ अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत
By Admin | Updated: November 11, 2015 01:32 IST2015-11-11T01:32:46+5:302015-11-11T01:32:46+5:30
सण व दिवाळी लक्षात घेत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेल, रवा, वनस्पती, मैदा व मिठाईबाबत नियमित व विशेष मोहीम राबविली.

४९ अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत
उशिरा आली अन्न व औषध प्रशासनाला जाग
वर्धा : सण व दिवाळी लक्षात घेत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेल, रवा, वनस्पती, मैदा व मिठाईबाबत नियमित व विशेष मोहीम राबविली. यात ४९ अन्न पदार्थांचे नमुने घेत ते सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस विश्लेषणासाठी पाठविण्यात आले.
या मोहिमेंतर्गत जन आरोग्याचा विचार करून मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत प्रत्येक स्तरावरून खाद्यतेलाचे ११, तूप व लोणी आणि वनस्पती प्रत्येकी दोन, पनीर ४, मैदा आणि बेसन प्रत्येकी ३, रवा व भगर २, खवा २, मिठाई ७ आणि गुलाबजामून व ढोकळा मिक्स ३, चॉकलेट २, मसाले ४, दूध ३ व इतर १ असे एकूण ४९ अन्न पदार्थांचे नमूने विश्लेषणासाठी घेण्यात आले. शिवाय एकूण ६४ तपासण्या करण्यात आल्या. कित्येक दिवसांपासून अन्न पदार्थांच्या तपासणीची मागणी होती. त्याकडे अन्न व औषधी प्रशासनाने डोळेझाक केली. आता दिवाळीच्या तोंडावर केलेल्या या कारवाईचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)