विविध कारवाईत ४६ हजारांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: September 6, 2014 02:16 IST2014-09-06T02:16:25+5:302014-09-06T02:16:25+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसांत पाच ठिकाणी कारवाई केली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून एकूण ४६ हजार ४०० रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

46 thousand of ammunition seized in various operations | विविध कारवाईत ४६ हजारांचा दारूसाठा जप्त

विविध कारवाईत ४६ हजारांचा दारूसाठा जप्त

वर्धा : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसांत पाच ठिकाणी कारवाई केली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून एकूण ४६ हजार ४०० रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पथकाने दारूबंदी महिला मंडळाच्या सहकार्याने पटेल चौक परिसरातील टिक्का हॉटेल येथे दारूविक्री होत असल्याच्या माहितीवरून धाड घातली. यात हॉटेल मालक नरेश डोडाणी याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून ९ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. याच दरम्यान आसिफ उर्फ मोट्या नामक दारू विक्रेत्याला त्याच्या घरासमोर दारू विक्री करताना अटक करण्यात आली. स्वत:च्या कंबरेवर दारूच्या शिशा अडकवून तो त्याची विक्री करताना आढळून आला. या कारवाईत ३ हजार रुपयांचा मुद्देमााल जप्त करण्यात आला.
हिंगणी येथील दारूविक्रेत्या दोन भावांवर कारवाई करण्यात आली़ यात आशिष मोतीलाल रॉय व अनूप मोतीलाल रॉय या दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याजवळून २० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुभाष कलसे नामक दारूविक्रेत्याला या पथकाने अटक केली. त्याच्याजवळून १४ हजार ४०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या पाचही जणांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाकल, उपनिरीक्षक लिंगाडे, मुल्ला, सहायक उपनिरीक्षक अशोक साबळे, राजू दहिलकर, जमादार नामदेव किटे, विलास गमे, वैभव कट्टोजवार, संतोष जययस्वाल, हरिदास काकड व चालक आत्माराम भगत आदींनी पार पाडली़(प्रतिनिधी)

Web Title: 46 thousand of ammunition seized in various operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.