शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीमाबंदीमुळे वर्धा जिल्ह्यात खासगी कंपन्यांतील ४ हजार कर्मचारी लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:15 IST

आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्यांचे ४ हजार कर्मचारी वर्ध्यातच लॉकडाऊन झाले आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारीची टांगती तलवार प्रवास परवानगीकरिता जिल्हा प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व कंपन्या व उद्योग बंद ठेवण्यात आले. आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने शिथिलता दिल्याने विविध कंपन्या व उद्योग सुरू झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थानाकडून करण्यात आल्या. मात्र, सीमाबंदी असल्याने लगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे खासगी कंपन्यांचे ४ हजार कर्मचारी वर्ध्यातच लॉकडाऊन झाले आहेत. ते कर्तव्यावर रुजू झाले नाही तर त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली असून त्यांनी प्रवास परवानगीकरिता जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाला ब्रेक लागला. ३१ मेपर्यंत सर्व खासगी कंपन्या, उद्योग बंद करण्याच्या करण्यात आले आणि घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नुकताच केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने कंपन्याही सुरू करण्यात आल्या आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व कर्मचाºयांना नोटीस बजावून कामावर रुजू होण्यास कळविले आहे. मात्र, वर्ध्यातून नागपूर, अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यात जाण्या-येण्याकरिता परवानगी मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कंपन्यांचे या लॉकडाऊनच्या काळात नुकसान झाल्याने कर्मचाºयांना २५ ते ३० टक्के कपात करून वेतन दिले जात आहे. अशातच आता कर्मचारी कामावर रुजू होऊ शकले नाही तर त्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वैदर्भीय रेल्वे एमएसटी प्रवासी संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

नोकरी गेल्यास परिवार उघड्यावरच्अमरावती, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवास करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. पण, अद्याप परवानगी मिळाली नसल्याने नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. नोकरी गेल्यास कुटुंबीय उघड्यावर येण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मनात घर करीत असल्याने याचा परिणाम अनेकांच्या प्रकृतीवरही होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. प्रशासनाकडून जाण्यास परवानगी मिळाल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने, ही अट आणखीच अडचणीची ठरत आहे. आधीच नुकसानीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेरोजगार होण्यापासून रोखण्यासाठी तत्काळ तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

वर्ध्यातून दररोज अमरावती, नागपूर व चंद्रपूर या ठिकाणी अपडाऊन करणाऱ्यांची संख्या ४ हजारांच्या घरात आहे. त्यापैकी बहुतांश कर्मचारी हे खासगी क्षेत्रात काम करणारे आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच वेतन कपातीचा सामना करावा लागला. आता कंपन्यांनी रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र सीमाबंदीमुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सोबतच १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा.एस.दुरतकर, कर्मचारी, खासगी क्षेत्र

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस