शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाल महोत्सवात ४०० चिमुकल्यांनी केला पक्षी, निसर्गाचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:01 IST

नई तालीम समिती परिसरातील शांती भवनात तीन दिवसीय बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसंयुक्त उपक्रम : शिक्षक मेळाव्यात १०० शिक्षकांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : नई तालीम समिती परिसरातील शांती भवनात तीन दिवसीय बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या सुमारे ४०० चिमुकल्यांनी पक्षी, प्राणी, निसर्ग यांच्या अभ्यास करीत प्रात्यक्षिकातून ज्ञानार्जन केले. महोत्सवाचा समारोप बुधवारी करण्यात आला.नई तालीम समिती, शिक्षण विभाग वर्धा, जिल्हा शैक्षणिक सा. व्य. वि. संस्था व बजाज समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाला ज्येष्ठ व्याख्यात्या प्रा.डॉ. रेखा महाजन, सरपंच रोशना जामलेकर, संजय सोनटक्के, विद्यार्थी प्रतिनिधी पालय शिवरकर, तणू वाणी, रसिका केकापुरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच जामलेकर यांनी शिबिरातून विद्यार्थ्यांना आनंद मिळाला, ते येथे रमल्याचे चेहऱ्यावर दिसून येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद होऊन विचारांची आदानप्रदान झाली असेल. येथे जे काम केले, जे शिकले, त्याचा दैनिक जीवनात उपयोग करा, असे सांगितले. सोनटक्के यांनी शिबिर म्हणजे गंमत-जमत, नवीन काही पाहायला मिळाले व शिकायला मिळाले. या ठिकाणावरून गेल्यावर काही विसरू नका. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोबाईल बाजूला ठेवा. मित्र-मैत्रिणीचा गट तयार करा आणि आपल्या गावातील पक्षी, प्राणी, झाडे, फळे आदींची माहिती गोळा करा. याचा अभ्यास करा. भविष्यात नक्कीच याचा उपयोग होणार, असे सांगितले. पायल शिवरकर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करीत बाल महोत्सव ही गरज असल्याचे सांगितले.याप्रसंगी जामलेकर व सोनटक्के यांच्या हस्ते शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बाल जगत तथा खादीची थैली देऊन प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. संचालन समन्वयक प्रा.डॉ. प्रभाकर पुसदकर यांनी केले. महोत्सवाला डॉ. शिवचरण ठाकूर, विजय कुरूले, संदीप भगत, पवन गणवार, रूपेश कडू, राजू चौधरी, गजानन गुरनूले, देवेंद्र गाठे, डॉ. सीमा पुसदकर, अनुश्री दोडके, उर्मिला हाडेकर, मंगला डोंगरे, वैशाली चिकाटे, अनिता भारती, सीमा मेहता, न्यू आर्टस व प्रियदर्शिनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील ४०० विद्यार्थी, १०० शिक्षक व शिक्षिका आणि ५५ शाळा सहभागी झाल्या होत्या.पपेट शो, पितळी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणतीन दिवस विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. मनोरंजासह शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत माहिती घेतली. पितळी वस्तू कशा बनवितात याची माहिती इंद्रजीतने दिली. पपेट शो नाव नव्या पिढीला माहिती असले तरी भारतात कठपुतळ्या खेळ होता. याचा इतिहास पद्मीनी रंगराजनने सांगितला. विद्यार्थ्यांनी यातून ज्ञान व आनंद घेतला. बाहुली बाहुल्याचे लग्न प्रत्यक्ष अनुभवले. सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांना संधी मिळाली. पर्यावरण व गांधीजींच्या जीवनावर लघुपट दाखविला. योग, व्यायाम, श्रमदान, आश्रम प्रार्थना, व्याख्यान, खेळ, गटचर्चा, मुक्त वेळ असा दैनिक क्रम होता.