जाणिवा झाल्या बोथट! ११ महिन्यांत ३५ हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:14+5:30

जिल्ह्यात हत्येसह महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारची आमिषे दाखविले जातात. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात.

35 murders in 11 months | जाणिवा झाल्या बोथट! ११ महिन्यांत ३५ हत्या

जाणिवा झाल्या बोथट! ११ महिन्यांत ३५ हत्या

ठळक मुद्देसंडे अँकर । ४२ अत्याचार, ३८ ठिकाणी जीवघेण्या हल्ल्यांनी हादरला गांधी जिल्हा

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हैदराबाद येथे गेल्या महिन्यांपूर्वी काही तरुणांनी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३८ हत्या करण्यात आल्या तर अत्याचाराच्या ४२ घटना घडल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. ३८ ठिकाणी प्राणघातक हल्ले तर विनयभंगाचे १७२ गुन्हे घडले आहेत. त्यामुळे ‘ती’च्या धोक्यात आलेल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रात्रीचे सोडाच दिवसाही महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्त्यावर होणारी छेडखानी, तर कुठे कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाच्या वेदना असाह्य करणाऱ्या आहेत. ही बाब समाज व पोलिसही गांभीर्याने घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने महिला हा त्रास मुकाट्याने सहन करीत आहे.
जिल्ह्यात हत्येसह महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारची आमिषे दाखविले जातात. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. काही दिवस हा प्रकार चालल्यानंतर फसवणूक झाल्याची बाब उजेडात येते. मग न्यायासाठी पीडित पोलीस ठाण्याची पायरी चढतात. मित्र म्हणूनही विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्यांकडून संधी साधून अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काहींनी तर वडील, काका, मामा, भाऊ या पवित्र नात्यालाच काळिमा फासली आहे. पीडितेच्या सहनशक्तीचा बांध फुटल्यानंतर या घटनांना वाचा फुटते. अशा घटनांनी समाजमन हादरून गेले आहे. मागील ११ महिन्यांत ४२ ठिकाणी बलात्कार तर १७२ विनयभंग, ६०३ कौटुंबिक हिंसाचार, पळवून नेणे, अशा अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अपहरणाचे ११० गुन्हे
महिला व मुलींना विविध प्रकारचे आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या ११0 घटना वर्षभरात घडल्या आहेत. त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. यातही नातेवाईक, प्रियकर, मित्रांकडूनच हे कारनामे झाले असल्याची पोलिसांत नोंद आहे.
१८७ ठिकाणी घरफोड्या; ५५८ चोऱ्या
जिल्ह्यात चोरी, घरफोडींचे सत्र वाढत असून पोलीस विभाग चोरट्यांवर वचक बसविण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात १८७ ठिकाणी घरफोडी तर ५५८ ठिकाणी चोरींच्या घटना घडल्या असून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यातील काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अनेक गुन्हे उघड करण्यात पोलिसांचा कस लागत आहे.

Web Title: 35 murders in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून