सहा ठिकाणच्या धाडीत ३५ जुगाऱ्यांना अटक
By Admin | Updated: August 27, 2014 23:47 IST2014-08-27T23:47:27+5:302014-08-27T23:47:27+5:30
पोळ्याच्या पर्वावर भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ३४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई कारंजा, समुद्रपूर व देवळी

सहा ठिकाणच्या धाडीत ३५ जुगाऱ्यांना अटक
वर्धा : पोळ्याच्या पर्वावर भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ३४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई कारंजा, समुद्रपूर व देवळी पोलिसांनी वेगवेगळ्या सहा ठिकाणी केली़
कारंजा पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून २१ जुगाऱ्यांना अटक केली़ यात ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ कारंजा येथील वॉर्ड क्ऱ ६ मध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेतले़ यात १६ हजार ६१० रोख, ९ मोबाईल, ताशपत्ते असा २९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ यात आशिष रामभरण जयस्वाल, स्वप्नील सुभाष जयस्वाल, मंगेश संतोष बोडखे, प्रतिक रमेश मस्के, शेख शब्बीर शेख हमीम, हितेश मधुकर मोरे, शेख जमील शेख अमिन, कार्तिक दिलीप जसानी, प्रशांत सोपन भिंगारे यांना अटक करण्यात आली़ हेटीकुंडी येथे दोन ठिकाणी धाड टाकून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यात जुगार खेळताना प्रदीपसिंग बिसलसिंग अद्रणे, अनिल केशव बारंगे, गजेंद्र मारोतराव दाखेकर, राजेंद्र नत्थूजी बन्सोड, सुरेश भाऊराव धंडाळे, आशीष केशवराव शेंडे, प्रफूल भगवान बारंगे, रोषण खवशी, मोहन चंफत कातलाम सर्व रा. हेटीकुंडी यांना अटक करण्यात आली़ ही कारवाई ठाणेदार उकंडे, सचिन रोकडे, प्रकाश मेश्राम, राधेश्याम टेंभरे, मनीष कांबळे, अमोल बरडे यांनी केली़
समुद्रपूर येथे सहा अटकेत
समुद्रपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगार खेळताना सहा जणांना अटक करण्यात आली. यात विजय देवराव मसराम, रुपराव ढोबळे, अमीत भिंगरे, सुरेश कन्हेरे, गजानन नाकाडे, गजानन राऊत रा़ राळेगाव यांचा समावेश आहे़ त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ यात २ हजार १०० रुपये रोख व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
वायगाव (नि़) येथे आठ अटकेत
देवळी पोलिसांनी वायगाव (नि़) येथे धाड टाकून दोन ठिकाणाहून आठ जुगाऱ्यांना अटक केली़ ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली़ पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमीत सुधाकर नभरावे, अतूल रामकृष्ण उमरे, अंकूश ज्ञानेश्वर दिवे, विजय मारोतराव घनमोडे यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून १ हजार २०५ रुपये रोख जप्त करण्यात आले़ दुसऱ्या कारवाईत सुरेंद्र सोनपितळे, आशिष मधुकर डवले, अखिल प्रकाश गोटे व मंगेश आटे यांना अट केली़ यात १ हजार २७५ रुपये जप्त करण्यात आले़ ही कारवाई ठाणेदारांच्या मार्गर्शनात शशिकांत जयस्वाल, अरुण जिकार यांनी केली़(लोकमत न्यूज नेटवर्क)