हिंगणघाट येथे ३५ कोटींच्या कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:00 IST2018-09-24T22:59:46+5:302018-09-24T23:00:10+5:30
येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकरण तसेच १.६९ कोटी रूपयात कारंजा चौक ते आमदार जनसंपर्क कार्यालयापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम या मुख्य कामांचा समावेश आहे.

हिंगणघाट येथे ३५ कोटींच्या कामांचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथे विशेष निधी अंतर्गत ३५ कोटीच्या हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचा शुभारंभ स्थानिक कारंजा चौक येथे करण्यात आला. या कामाअंतर्गत १५ कोटी रूपयात शहरातील मध्यवर्ती तुकडोजी पुतळा चौक ते टिळक चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण व सौंदर्यीकरण तसेच १.६९ कोटी रूपयात कारंजा चौक ते आमदार जनसंपर्क कार्यालयापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम या मुख्य कामांचा समावेश आहे.
हिंगणघाट न.प. निवडणुकीत हिंगणघाट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे वचन आपण हिंगणघाटच्या नागरिकांना आपण दिले होते. जे स्वप्न आपण पाहिले होते ते प्रत्यक्षात येताना बघून आपल्याला आनंद होत असल्याचे आ. समीर कुणावार यावेळी म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस होते. यावेळी व्यासपीठावर आ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष पे्रम बसंतानी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, बांधकाम सभापती वामन मावळे, भाजपा शहर अध्यक्ष आशीष पर्बत, अनिता मावळे, अंकुश ठाकूर, राहुल सोरटे, अर्चना जोशी, सुनिता पचोरी, शीतल खंदार, सौरभ तिमांडे आदी नगरसेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर दिघे यांनी केले. संचालन प्रा. किरण वैद्य यांनी केले तर उपस्थितांचे आभार न.प. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मानले.