शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

वर्धा जिल्ह्यातील ३.४६ लाख विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:29 IST

राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारीपासून विशेष मोहीमकृमीदोष टाळण्यासाठीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.वर्धा जिल्ह्यात ग्रामीण भागात २ लाख २१ हजार ५८१ तर शहरी भागात १ लाख २५ हजार १९९ विद्यार्थी आहेत. त्यांना १० फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येणार आहेत. निमशासकीय, नगर पालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी आदी ठिकाणी या गोळ्या आरोग्य विभागाच्यावतीने पोहोचविण्यात आल्या आहेत. या गोळ्या १ ते १९ वयोगटातील सर्वच बालकांना देण्यात येणार आहे. त्यापैकी १ ते २ वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर यावरील वयोगटातील बालकांना पूर्ण गोळी देण्यात येणार आहे.मुलांमध्ये वाढत असलेल्या कृमीदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्यावतीने १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन व १५ फेब्रुवारीला मॉप अप दिन राबविण्यात येणार आहे. या दोन दिवसात या गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात ९१६ शासकीय शाळा, ९१ शासकीय अनुदानित शाळा, ९ नगर पालिकेच्या शाळा, १४६ खासगी अनुदानित शाळा, अशा एकूण ११६२ शाळा व १४४१ अंगणवाड्या आहेत. यातील सर्वच बालकांना गोळ्या देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शाळाबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.

मोहिमेतून कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वगळलेया मोहिमेतून आरोग्य विभागाने शहरी व ग्रामीण भागात असलेल्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना वगळल्याने या मोहिमेला भेदभावाचे गालबोट लागले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शासकीय, खासगी अनुदानित व अंगणवाडीतील बालकांना गोळ्या देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आहेत. बालकांसंदर्भात शासन भेदभाव करीत असून या निर्णयामुळे शासनाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याचे दिसत आहे.

कृमी दोषामुळे रक्ताशय आणि कुपोषणबालकांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन कृमीदोषांमुळे रक्ताशय आणि कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बालक कमजोर होतात. शिवाय त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचा धोका आहे. देशात ५ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण ७० टक्के आहे. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के मुलांमध्ये रक्ताशय आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रात हे प्रमाण २९ टक्के आढळले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी