सहा जागांकरिता ३४ नामांकन दाखल
By Admin | Updated: December 18, 2015 02:38 IST2015-12-18T02:38:00+5:302015-12-18T02:38:00+5:30
येथील पालिकेच्या आठपैकी चार प्रभागातील ६ जागांसाठी पोटनिवडणूक होवू घातली आहे.

सहा जागांकरिता ३४ नामांकन दाखल
हिंगणघाट पालिकेची पोटनिवडणूक
हिंगणघाट: येथील पालिकेच्या आठपैकी चार प्रभागातील ६ जागांसाठी पोटनिवडणूक होवू घातली आहे. यात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३४ अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबर उमेदवारीमागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतरच प्रत्येक जागेचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक पक्षविरोेधीत मतदानातून अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. गुरुवार नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. २ (अ) मधून मेघा नितीन मडावी (भाजपा), सुरेखा शंकर मडावी (अपक्ष), शोभा उद्धव सराटे (राकाँ.), छाया रामदास मडावी (बसपा) यांचा समावेश असून येथील जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.
प्रभाग क्र. २ (ब) मध्ये इतर मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असून यात निता सतीश धोबे (भाजपा), ज्योती मनोज वरघने (अपक्ष), शीतल दिनेश देशकरी (राकॉ.), सारिका लिलाधर कानबाळे (अपक्ष), वैशाली धिरज भगत (अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले आहे.
प्रभाग क्र. ५ (ब) मधील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीयांसाठी राखीव असून यात शुभांगी सुनील डोंगरे (भाजपा), निता प्रकाश वानखेडे (राकाँ), हेमा मनिषा तडस (काँग्रेस), जायदा शेख गणी शेख (बसपा) यांनी नामांकन दाखल केले आहे.
प्रभाग क्र. ६ (अ) नामाप्रसाठी राखीव असून यात हरिदास बळीराम काटकर (अपक्ष), मनीष वसंत देवढे (भाजपा), अमित राजेंद्र चाफले (राकाँ.), आरती गजानन कुबडे (अपक्ष), मोनु बंडु निखाडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
प्रभाग क्र.६ (ड) सर्वसाधारण असून यात प्रलय भाऊराव तेलंग (अपक्ष,) भूषण श्याम पिसे (राकाँ.), संजय रामदास इखार (अपक्ष), रविला शिवाजी आखाडे (भाजपा), दिवाकर बाळकृष्ण वाघमारे (अपक्ष), भूपेंद्र महादेव भरडकर (अपक्ष) यांनी नामाकंन दाखल केले.
प्रभाग क्र. ७ (ड) सर्वसाधारण यात संजय दिनकर जैन (शिवसेना), अॅड. स्वप्नील जयंत धारकर (भाजपा), सुरेश रामाजी मुंजेवार (अपक्ष), उमेश विठ्ठल वकील (अपक्ष), श्याम भास्कर हंडपवार (अपक्ष), सचीन व्यंकटेश वाघे (अपक्ष), सौरभ राजू तिमांडे (राकाँ), मोहंमद शकील मोहंमद जब्बार (राकाँ), राजेश रमेश हिंगमीरे (काँग्रेस), टिकाराम गणबाजी जवादे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.(तालुका प्रतिनिधी)