हिंगणघाट येथे ३३ हजारांची देशी दारू जप्त
By Admin | Updated: July 9, 2016 02:18 IST2016-07-09T02:18:09+5:302016-07-09T02:18:09+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात हिंगणघाट मार्गे दारू जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत ३३ हजार ६०० रुपयांची देशी दारू जप्त केली.

हिंगणघाट येथे ३३ हजारांची देशी दारू जप्त
दोन ठिकाणी कारवाई : नागपूर येथील चार जणांवर गुन्हा दाखल
वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यात हिंगणघाट मार्गे दारू जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत ३३ हजार ६०० रुपयांची देशी दारू जप्त केली. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी गुरुवारी रात्री नंदोरी मार्गावर केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ डीई ४५३१ क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जात असल्याची मिळाली. या माहितीरून सापळा रचून माहिती असलेली गाडी येतांना दिसली असता वाहन चालकाला थांबविण्याचा इशारा दिला असता गाडी थांबविण्यात आली. या वाहनाची झडती घेतली असता यात ३३ हजार ६६० रुपयांची देशी दारू जप्त आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सूरज विश्वास घुसे (२६), रा. अष्टविनायक नगर जयताळा, नागपूर, प्रणय शेंडे रा. त्रिमुर्तीनगर, नागपूर या दोघांविरूद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहीे.
या मार्गावर काही काळातच एमएच ३१ डीसी ६६९१ क्रमांकाने दारूसाठा जात असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदी दरम्यान गाडीची झडती घेतली असता त्यात ७६ हजार ८०० रुपयांच्या ३८४ विदेशी दारूच्या वाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत वाहनासह एकूण ९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी स्वप्नील रवींद्र इंगळे (३४), श्रीमूर्ती नगर, नागपूर सूरज रामचंद्र डोंगरे (२८) स्वावलंबी नगर, नागपूर या दोघांविरूद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.