विविध कारवाईत ३.२८ लाखांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: June 13, 2016 00:41 IST2016-06-13T00:40:18+5:302016-06-13T00:41:07+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून केलेल्या कारवाईत वाहनांसह ३. २८ लाखाचा दारूसाठा जप्त केला.

विविध कारवाईत ३.२८ लाखांचा दारूसाठा जप्त
सहा आरोपी अटकेत : जिल्ह्यात धाडसत्र सुरूच
वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून केलेल्या कारवाईत वाहनांसह ३. २८ लाखाचा दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी सहा जनांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
देशी आणि विदेशी दारूचा साठा घेऊन जात असताना हिंगणघाट पोलिसांनी मालवाहू एम.एच.३२ सी.९५५८ ची तपासणी केली. अमित दासरवार (२६) रा. तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट हा त्याच्या साथीदार बॉबी ऊर्फ राहुल विठ्ठल पंडित (३०) यासह वाहनातून सिंदी (रे.) पोलीस स्टेशन या मार्गाने दारूचा साठा हिंगणघाट येथे विक्रीकरिता आणीत आहे. या माहितीवरून सिंदी (रे.) हद्दीत नाकाबंदी करून वाहनाची झडती घेतली. यातून १८० मिलिच्या १४४ बाटल्या असा २८ हजार ८०० रूपये, देशी दारूच्या १८० मिलिच्या ९६ निप किंमत ९ हजार ६०० रूपये, दोन मोबाईल आणि मालवाहक असा एकुण १ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीवर सिंदी (रे.) पोलिसात कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), ८२ मुदाका सहकलम (३) (१), १८१, १३०/१७७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अचलकुमार मलकापुरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, दिनेश तुमाणे, संजय बोगा, तुषार भुते, भूषण पुरी यांनी केली आहे. या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांकडून वॉश आऊट मोहीम राबविली जात आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
कारसह १.७८ लाखाचा दारूसाठा जप्त
हिंगणघाट - शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत कारसह १ लाख ७८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नन्नाशाहा वॉर्डाकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी ही कारवाई केली. कार एमएच ३१ सीआर ८९१४ ला थांबवुन पाहणी केली असता २८ हजार ८०० रूपये किमतीची देशीदारू हस्तगत केली. याप्रकरणी आकाश हरीश दुबे (१९) रा. संत्रा मार्केट नागपूर व राकेश बापूराव सोरटे (१६) रा. तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार विवेक लोणकर, जमादार मारोती उईके, धर्मेंद्र तोमर, गजेंद्र धरमे, राजेश तिवस्कर, सतीश नंदागवळी, समीर कामडी यांच्या पथकाने ही कारवाई केली.