शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वर्धेकरांची तृष्णातृप्ती करणाऱ्या ‘धाम’त 29.85 दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील काही गावांना जलसंकटाला सामारे जावे लागत असल्याचे वास्तव असले तरी महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील २० गावांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचाच ठरतो. सध्या या जलाशयात २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यात मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू पाहत आहे. परिणामी अनेक नागरिकांनी त्यांच्याकडील कुलर सुरू केल्याने पाण्याचा वापरही वाढला आहे. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांत सद्यस्थितीत समाधानकारक जलसाठा असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर न झाल्यास नागरिकांना जलसंकटाचा तोंडच द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करण्याची गरज आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा न.प. प्रशासन करते उचल-    वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. तर वर्धा शहराशेजारील गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. स्थानिक स्वराज्य संस्था असलेले वर्धा नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही पाणी उचल संस्था धाम नदीच्या येळाकेळी तसेच पवनार येथील नदीपात्रातून पाण्याची उचल करतात.

पिण्यासाठी मागणीनुसार सोडणार धाम प्रकल्पातून पाणी-    जिल्ह्यातील प्रत्येक मध्यम व मोठ्या जलाशयातील काही टक्के जलसाठा सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने जलाशयांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. तर आता पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसारच जलाशयांमधून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.

सिंचनासाठी धाममधून सोडले २८.०३ दलघमी पाणी-    पावसाळ्याच्या दिवसांत १०० टक्के भरलेल्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून यंदा सिंचनासाठी तब्बल २८.०३ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. ५९.४८५ दलघमी एकूण साठवण क्षमता असलेल्या या जलाशयात सद्यस्थितीत २९.८५ दलघमी जिवंत जलसाठा आहे. हाच जलसाठा उन्हाळ्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी