२१ ग्रा.पं.तील २७ गावे टंचाईग्रस्त
By Admin | Updated: March 11, 2015 01:40 IST2015-03-11T01:40:17+5:302015-03-11T01:40:17+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे.

२१ ग्रा.पं.तील २७ गावे टंचाईग्रस्त
सुरेंद्र डाफ आर्वी
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे. तर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २७ गावे संभाव्य पाणी टंचाईसाठी आर्वी पं.स. ने उपाययोजनेसाठी पाठविली आहे.
तालुक्यात एकूण ६९ ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी २८ ग्रामपंचायतीमधील गावात तीव्र पाणी टंचाई सदृश्य स्थितीतील गावावर संभाव्य पाणी अंचाई भासणार आहे. यासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्याद्वारे आर्वी तालुक्यातील बोदड, पाचोड (ठाकूर), बेल्हारा (ता.) जांब पुनर्वसन, तरोडा, खुबगाव, नांदपूर ही गावे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या तीमाहीसाठी टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सार्वजनिक विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या पाणी टंचाईवरील उपायासाठी तालुक्यातील ९ सार्वजनिक विहिरींचे अधिग्रहण, सात नवीन हातपंप नळयोजनेंतर्गत विहीर खोलीकरण, पाईप लाईन दुरूस्तीचे दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या उपाययोजनातून पहिल्या टप्प्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.