नऊ टिप्परसह २७ ब्रास रेतीसाठा जप्त
By Admin | Updated: January 8, 2016 02:37 IST2016-01-08T02:37:38+5:302016-01-08T02:37:38+5:30
तालुक्यातील मानगाव रेती घटावरून एका रॉयल्टीवर तीन ट्रक रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती ...

नऊ टिप्परसह २७ ब्रास रेतीसाठा जप्त
समुद्रपूर तहसीलदाराची मानगाव घाटावर कारवाई
समुद्रपूर : तालुक्यातील मानगाव रेती घटावरून एका रॉयल्टीवर तीन ट्रक रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. यावरून त्यांनी कारवाई केली. यात त्यांनी नऊ टिप्पर जप्त केले. यात १ लाखाची रेती व ४५ लाख रुपयांचे टिप्पर असा एकूण ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तहसीलदार सचिन यादव यांनी बुधवारी मध्यरात्री केली.
सुत्रानुसार, मानगाव घाट येथील ठेका महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट नामक कंपनीला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराने प्रयेक ट्रकला रॉयलटी देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. येथून टिप्परधारक एक रॉयल्टीवर तीन ते चार ट्रीप आणत होता. यात कंत्राटदाराचा लाभ होत होत असला तरी शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याची तालुक्यात ओरड सुरू झाली.
याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांच्या कानावर आली. त्यांनी या गुप्त सुचनेच्या आधारावर मंडळ अधिकारी मुन्नालाल भलावी, वाहन चालक राजू आखाडे यांच्या सहाय्याने नऊ टिप्परची तपासणी केली. त्यांच्याकडे रायल्टी मिळाली नाही. रॉयल्टी नसल्याच्या कारणावरून त्यांनी ४५ लाख रुपयांचे टिप्पर व १ लाख रुपयांची रेती जप्त केली.
त्यांनी जप्त केलेल्या टिप्परमध्ये एमएच ४० वाय ३३२४, एमएच ३१ सीक्यू २६०४, एमएच ३१, ३२१५, एमएच ३४ एबी ५२५७, एमएच ३१ सीबी ३०३७, एमएच २७ सी ४६३, एमजी ०४ जे २६३८, एमएच ३१ सीबी ५८६७, एमएच ३१ सीक्यू ७१५५ क्रमांकांच्या वाहनांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)