२६ गरजू विद्यार्थ्यांना ‘सौर दीप’चे वाटप
By Admin | Updated: November 18, 2015 02:20 IST2015-11-18T02:20:51+5:302015-11-18T02:20:51+5:30
आपुलकी संस्थेच्या वतीने तालुक्यातील २६ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ‘सौर दीप’चे वाटप केले.

२६ गरजू विद्यार्थ्यांना ‘सौर दीप’चे वाटप
प्रकाशवाट : आपुलकीचा उपक्रम
कारंजा (घा.) : आपुलकी संस्थेच्या वतीने तालुक्यातील २६ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ‘सौर दीप’चे वाटप केले.
तालुक्यातील १६ माध्यमिक शाळेतून १० वी व १२ वीत शिकणाऱ्या अत्यंत गरीब, होतकरू आणि हुषार अश्या २६ विद्यार्थ्यांची निवड करून येत्या वार्षिक परीक्षेत घरात वीज नसतानाही सहज अभ्यास करून त्यांना शैक्षणिक ध्येय गाठण्यास मदत व्हावी या उद्देशाने गुरुदेव सेवामंडळाच्या प्रार्थना मंदिरात आयोजित ‘प्रकाशवाट’ कार्यक्रमात सदर वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा योग प्रशिक्षक राजीव पालीवाल तर प्रमुख वक्ते म्हणून संजय नाथे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आपूलकीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत फाळके, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अरुण फाळके, प्रा. अनिल भांगे, सनशाईन स्कूलचे अध्यक्ष प्रेम महिले, बोबडे उपस्थित होते. यावेळी प्रा. अनिल भांगे, प्रेम महिले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभिजीत फाळके यांनी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उद्दिष्टपूर्ती करिता केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अश्विनी पाटमासे, सनी बागडे, शुभांगी गिऱ्हाळे, ममता टोपले, सुप्रिया परतेती, साक्षी नरसिंगकार, वैभव मांडवकर, साक्षी नारनवरे, वीरेंद्र गजभिये, प्रविणा बन्नगरे, संकेत इरपाते, पायल युवनाते, दुर्गा अंबडारे, कृष्णाकुमारी नेताम, भुमिता उईके, मनीषा सुरजूसे, वैशाली कोहळे, दीपाली गाडगे, कविता मुन्ने, आकाश रमधम, संध्या धारपुरे, किरण बिसने, अश्विनी मडावी, गजानन गाडरे या विद्यार्थ्यांना सौरदिव्याचे वाटप करण्यात आले. संचालन करीत आभार गजानन बोरकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता सुरेश गांधी, अशोक पठाडे, गुणवंत मुडे, संजय भोकरे, किशोर कडमधाड, अंकुश खडतकर, भारत कोरडे, रमेश चाफले, प्रभाकर बरगट, विजय बारई आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)