लोकशाही दिनात २६ तक्रारी जुन्याच
By Admin | Updated: October 6, 2015 02:44 IST2015-10-06T02:44:12+5:302015-10-06T02:44:12+5:30
लोकशाहीदिनात नव्याने दाखल झालेल्या तक्रारी कमी असल्या तरी जुन्याच तक्रारी अधिक असल्याचे दिसून आले. या

लोकशाही दिनात २६ तक्रारी जुन्याच
वर्धा : लोकशाहीदिनात नव्याने दाखल झालेल्या तक्रारी कमी असल्या तरी जुन्याच तक्रारी अधिक असल्याचे दिसून आले. या तक्रारी मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या तरी त्या तशाच असल्याचे पुढे आले. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात चार नव्या तक्रारी दाखल झाल्या असून आलेल्या एकूण ३० तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकशाही दिनाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, उपजिल्हाधिकारी पांडे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, महावितरणचे शंकर कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, परिवहन महामंडळाचे नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांची उपस्थिती होती. नलवडे म्हणाले, लोकशाहीदिनामध्ये वैयक्तिक स्वरूपाचा तक्रारी दाखल करण्यात याव्यात. संबंधित विभागानी तक्रारीबाबत कार्यवाहीचा अहवाल कळविला असल्यास वा त्या तक्रारीचा निपटारा केला असल्यास त्या तक्रारीवर, कार्यवाहीवर काही आक्षेप असल्यास विभागीय, मंत्रालयीन स्तरावरील लोकशाहीदिनामध्येही तक्रार नोंदविता येते, असेही त्यांनी यावेळी तक्रारदारांना सांगितले. तक्रारींचा निपटारा शीघ्र करा, अशा सूचना देण्यात आल्या.(प्रतिनिधी)