शेतकरी आत्महत्येच्या २५ प्रकरणांना मंजुरी
By Admin | Updated: April 30, 2015 01:59 IST2015-04-30T01:59:26+5:302015-04-30T01:59:26+5:30
शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

शेतकरी आत्महत्येच्या २५ प्रकरणांना मंजुरी
वर्धा : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ प्रकरणांपैकी २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कानगाव येथील नानीभाई किसना भोयर यांच्या प्रकरणाचा फेरतपास तर सोरटा येथील मृतक अर्जुन गजानन चवरे यांचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार पंकज भोयर, डॉ. नंदकिशोर तोटे, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर, सहायक पोलीस अधीक्षक प्रदीप डोंगरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. जिल्हास्तरीय समितीसमोर उपविभागीय महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयातर्फे २७ प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट तहसील अंतर्गत पिपरी येथील विठ्ठल दुर्गे (८०), हिंगणघाट येथील सचिन तिमांडे (२५), अल्लीपूर येथील गुणवंत गिरडे (२४), कानगाव येथील जितेंद राळेकर (३२), देवळी तालुक्यातील येसगाव येथील अनुज राऊत (२३), समुद्रपूर तालुक्यातील कांढळीचे नाना इंगोले (७५), कोरा येथील रामू नखाते (७७), उमरी येथील रामचंद्र भोयर (५१), वर्धा तालुक्यातील दहेगावचे पंकज दाते (३०), धामणगाव वाठोडा येथील सुरेंद्र वानखेडे (३४), देवळी तालुक्यातील कोल्हापूरच्या अन्नपूर्णा मुरार (५२), आपटीचे पंकज निसारकर (२५), मुदलगावचे रमेश भिलकर (६५), गौळचे प्रवीण मोडक (४०) आष्टी तालुक्यातील सचिन पिसे (३०), माणिकवाड्याचे शंकर खवशी (४८), साहुर आष्टीचे विठ्ठल लवणकर (५५), सेलू तालुक्यात आर्वी (ल.) येथील दिनेश लहाने (४०), खैरीचे महादेव सयाम (५४), आर्वीचे नरेंद्र उपाध्ये (४५), प्रफुल्ल जयसिंगपुरे (३९) यांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील सावलीचे शेख बसिरूद्दीन मयनुद्दीन (७०) आष्टी तालुक्यातील चिस्तूरचे अशोक माणिकराव भालेराव (५५) कारंजा तालुक्यातील एकांब्याचे हरिभाऊ विठोबाजी विरोळे ही प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविली आहेत.
जिल्ह्यात जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१५ पर्यंत १७५ प्रकरणे सादर झाली असून त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने १२२ प्रकरणे पात्र ठरवून त्यांना सानुग्रह मदत अनुदान मंजूर केले आहे. २३ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.(शहर प्रतिनिधी)