पुलगाव पोलिसात अवैध वाहतुकीचे २,२५७ गुन्हे
By Admin | Updated: November 3, 2014 23:30 IST2014-11-03T23:30:21+5:302014-11-03T23:30:21+5:30
शहरात वाहतूक नियमांचे अल्लंघन करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ हजार २५७ वाहन चालकांविरूद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण ६६ हजार १९२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुलगाव पोलिसात अवैध वाहतुकीचे २,२५७ गुन्हे
किरण उपाध्ये - पुलगाव
शहरात वाहतूक नियमांचे अल्लंघन करून अवैध वाहतूक करणाऱ्या २ हजार २५७ वाहन चालकांविरूद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एकूण ६६ हजार १९२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गत दहा महिन्यात ही कारवाई करण्यात आली असून यावेळी प्रथमच स्कूल व्हॅनवर कारवाई केली आहे.
लोकसंख्या वाढीच्या पाठोपाठ गावाचे शहरीकरण झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागात वाहनांची संख्या वाढली आहे. कॉन्व्हेंट, शाळा, महाविद्यालये वाढल्याने स्कूल बस व इतर खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. ही सर्व वाहने चालविणारे चालक वाहतूक नियमाचे पालन करतातच असे नाही. स्कूलव्हॅनवर पिवळ्या रंगाची पट्टी असावी, गतीवर नियंत्रण असावे, विद्यार्थ्यांना वाहनात मोकळे बसता यावे आदी नियमांचे पालन यांच्याकडून होत नसल्याचे शहरात समोर आले आहे. अशाच एका स्कूल बसला झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांना नाहक जीव गमवावा लागला होता.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारताच स्कूल आॅटो व व्हॅन खरेदी केल्या आहेत. तरीही बेसावधपणे व वेगावर नियंत्रण न ठेवणाऱ्या चालकांविरूद्ध कारवाई होणे गरजेचे आहे. काही वाहनामध्ये गॅसकीट बसविली जात आहे. यामुळे मुलांना चक्कर, मळमळचा त्रास होतो. वाढत्या उन्हात गॅस लिक होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
पोलिसांनी रहदारीस अडथळा निर्माण करणे, दुचाकी वाहनावर दोनपेक्षा अधिक व्यक्ती बसवणे, वाहतूक परवाना (लायसन्स) वा कागदपत्र न बाळगणे, बेजबाबदारपणे भरधाव वाहन चालवणे, वाहनावर नंबर प्लेट न लावणे, आॅटो चालकाने समोरील सीटवर प्रवासी बसवणे, चार चाकी वाहनाच्या काचांवर काळ्या फिल्म बसवणे आदी कारणाखाली कारवाई केली आहे. मात्र अजूनही अवैध वाहतूक आहे त्याच स्थितीत सुरू आहे.
पोलिसांची कारवाई सुरू असून यात वेगात व नागमोडी वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणे गरजचे आहे. गत दहा महिन्यात फक्त २४ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यां विरूद्धच कारवाई केल्याची नोंद आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस सांगत आहेत.