२२ शाळांत अध्यापनासाठी मानधनावर युवक

By Admin | Updated: February 13, 2015 00:29 IST2015-02-13T00:29:39+5:302015-02-13T00:29:39+5:30

अध्यापनाच्या पवित्र कार्यासाठी शिक्षकांची नियुक्ती आहे; पण काही शिक्षकांनी आपल्या अधिनस्त खासगी युवकांना शिकवणीसाठी ठेवले.

22 young man on the grass for teaching in schools | २२ शाळांत अध्यापनासाठी मानधनावर युवक

२२ शाळांत अध्यापनासाठी मानधनावर युवक

आष्टी (श़) : अध्यापनाच्या पवित्र कार्यासाठी शिक्षकांची नियुक्ती आहे; पण काही शिक्षकांनी आपल्या अधिनस्त खासगी युवकांना शिकवणीसाठी ठेवले. त्यांना स्वत:च्या वेतनातून मानधन देत शिक्षणाचा गाडा हाकणे सुरू आहे. या प्रकरणी कारवाई होणे गरजेचे झाले आहे़
पाच वर्षांपासून शिक्षकांबाबत समाजातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. भविष्य घडविण्याचे सोडून अनेक शिक्षक व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेत़ वर्धा जिल्ह्यात पाच वर्षांत ११४ बलात्काराच्या घटना घडल्या़ स्वत:ची नोकरी, कुटुंब याची तबा न बाळगता शिक्षक हे कृत्य करताना दिसतात़ अनेक शिक्षक मद्यप्राशन करून अध्यापनाचे पवित्र काम करतात. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीच्या राजकारणाचा फायदा घेत शिक्षकांनी भलताच उद्योग सुरू केला़ शालेय कामाच्या अतिरिक्त तणावापासून विश्रांती म्हणून काही शिक्षक पेटी शिक्षकांची मदत घेत आहे. आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात एकूण २२ शाळांत पेटी शिक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. या पेटी शिक्षकांना महिन्याकाठी वेतनातून ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत मानधन देतात. यामुळे शिक्षकांना शाळांतील पोषण आहार वरकमाईचे साधन बनल्याचे दिसते़ विद्यार्थ्यांना दररोज सकस आहार देण्याऐवजी पिवळा भात दिला जात आहे़ आष्टी तालुक्यात अनेक शाळांत शिक्षण कमी व मनोरंजन अधिक असल्याचे चित्र आहे. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: 22 young man on the grass for teaching in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.