जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्यासाठी २२ नोडल अधिकारी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:15+5:30

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असताना वर्धा जिल्हा मात्र, ग्रीन झोनमध्ये होता. पण, हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे होत अधिक सतर्क झाले. प्रशासनाच्यावतीने आर्वी न.प. हद्दीत चार दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला. पण, मृत महिलेच्या संपर्कातील सर्वांचेच रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने काहीअंशी नागरिकांना दिलासा मिळाला.

22 nodal officers on the ground to provide essential services | जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्यासाठी २२ नोडल अधिकारी मैदानात

जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्यासाठी २२ नोडल अधिकारी मैदानात

ठळक मुद्देन.प.द्वारा निर्जंतुकीकरण। होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरात फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नुकतेच हिवरा (तांडा) येथे मृत महिला पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट होताच आर्वी पालिकेकडून शहरात आरोग्यविषयक विविध उपाययोजनांना गती आली असून प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील नागरिकांच्या हालचालीवर वॉच ठेवण्यासाठी तसेच त्यांना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विविध प्रभागांत २२ नोडल अधिकारी नियुक्त केले असून होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरात औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असताना वर्धा जिल्हा मात्र, ग्रीन झोनमध्ये होता. पण, हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे होत अधिक सतर्क झाले. प्रशासनाच्यावतीने आर्वी न.प. हद्दीत चार दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला. पण, मृत महिलेच्या संपर्कातील सर्वांचेच रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने काहीअंशी नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, सध्या मोठ्या प्रमाणात रेड आणि ऑरेंज झोनमधून नागरिक शहरात दाखल होत असल्याने अद्यापही धोका टळलेला नसून सतर्क राहण्याची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने आर्वी नगर पालिका क्षेत्रात बाहेरगावावरून आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेल्यांच्या निवासस्थानी औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्याचे काम सुरू आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कोणीही घराबाहेर पडू नये, म्हणून विविध प्रभागात तब्बल २२ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस आपले कर्तव्य जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे पथक प्रमुख रणजित पवार, साकेत राऊत यांनी सांगितले. यासोबतच हैबतपूर आणि पॉलिटेक्नीक हॉस्टेल येथील दैनंदिन स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारीही आर्वी नगरपालिकेचे कर्मचारी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून करीत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यास पालिका सज्ज झाली आहे.

Web Title: 22 nodal officers on the ground to provide essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.