शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:02 IST

आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.

ठळक मुद्देनवविवाहित दाम्पत्यांना भेटवस्तू : बच्छराज धर्मशाळेतून निघालेली नवरदेवांची वरात ठरली आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रीक डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, कॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन असोसिएशन समितीच्या वतीने जुने आरटीओ मैदान येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. यात तब्बल २२ जोडपी विवाहबद्ध झालीत.सोहळ्यापूर्वी दुपारी ४ वाजता संपूर्ण नवरदेवांची वरात बच्छराज धर्मशाळा शास्त्री चौक येथून बग्गी, घोडे व बँड पथकासह आकर्षक तथा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. ही वरात शहराच्या मुख्य मार्गाने फिरून सायंकाळी ६.४५ वाजता मंडपात पोहोचली. गेटवर सर्व नवरदेवांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. सोहळ्याला अतिथी म्हणून मानव सेवा संस्थान परतवाडाचे अध्यक्ष संत नानाजी महाराज तसेच खा. रामदास तडस, आ. अमर काळे, डॉ. सचिन पावडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, नगरसेवक प्रदीप जग्याशी, श्रेया देशमुख, प्रदीप ठाकरे, प्रवीण धोपटे, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य के.पी. बर्धिया, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुधीर भोसले, प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, दामोधर राऊत, प्रशांत पिंजरकर, श्रीकांत राठी, प्रशांत कोल्हे, मोहन मिसाळ, सुनील भोवरे, विजू ठाकरे उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष शिवा तरोडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालन संस्थेचे सहसचिव संजय ठाकरे यांनी केले.सोहळ्यात प्रथम सात जोडप्यांचा बौद्ध धर्मानुसार भंते राजरत्न यांच्या हस्ते लग्नविधी पार पडला. हिंदू पद्धतीनुसार प्रदीप विंजे महाराज यांनी हिंदू विधीनुसार मंगलाष्टकासह विधी पार पाडला. यानंतर वर-वधू यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. समितीद्वारे त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. अशोक कठाणे यांनी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र, गुलाब शेंडे यांनी मुला-मुलीचे कपडे केले तर राजेंद्र राजुरकर, सुनील पटेल, बाबाराव काळे, सुरेश नाथानी, पवन बलवाणी, दिलीप भातकुलकर, सुनील गुजर, नितीन शिंदे, विक्की पाटील, रवी वघळे, गणेश तोडे, सुनीता जुमडे, मनोज कत्रोजवार, हुसेन भाई, नंदू अनवाणी, रोशन पटेल, राजा पुरोहित, अतुल तराळे आदींनी भेटवस्तू दिल्या. आभार माधुरी राठी, शीतल लाजुरकर यांनी मानले.सोहळ्याला कुलदीप तराळे, राहुल जैस्वाल, संदीप तराळे, रमेश तानेवाल, परेश देशमुख, सतीश देशमुख, सचिन मसराम, श्रीकांत राठी, मोहन मिसाळ, प्रशांत कोल्हे, सुनील भोवरे, संजय ठाकरे, विजू ठाकरे, राजेंद्र राजुरकर, सुरेश नाथानी, दिलीप भातकुलकर, विनोद भोरे, नितीन शिंदे, हुसेन भाई, आंनद राठी, कवडू कठाणे, महेंद्रा चांदुरकर, नंदू भुतडा, मंगेश अमदुरकर, देवनाथ बाहेकर, संदीप वांदिले, महेंद्र मेश्राम, रवी नगराळे, प्रशांत सहारे, नाना आटे, इंद्रपाल जोगे, फिरोज खान, आकाश भोवरे, राजेश मौर्या, राहुल रामटेके, अक्षय जामुनकर, विकास ठाकरे, टेकाम यासह समिती कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.मॅमोग्राफी तपासणी शिबिरशनिवारी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यापूर्वी ५ व ६ एप्रिल रोजी मेमोग्राफी तपासणी शिबिर पार पडली. शिबिराकरिता रोटरी क्लब गांधी सिटी व आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) यांचे सहकार्य लाभले. यात महिलांची तपासणी करून सल्ला देण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न