शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

टोकणधारक २,१७४ शेतकऱ्यांनी अल्पदरात विकले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देखासगी व्यापाऱ्यांची चांदी : कृषी विभागाच्या गलथान कारभाराचा जिल्ह्यातील बळीराजाला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कापसाचे किती उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा अंदाज यंदा चुकल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन गृहभेटी घेऊन जिल्ह्यातील शेतकºयांच्या घरी अंदाजे किती कापूस शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ७९२ शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन पाहणी केली असता सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेल्या टोकण धारक २ हजार १७४ शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात पांढरेसोने विकल्याचे पुढे आले आहे. एकूणच कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजाचा जिल्ह्यातील बळीराजाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील एकूण ५० हजार ८८५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाकडे त्यांनी उत्पादीत केलेले पांढरेसोने विक्री करण्यासाठी नोंदणी करून टोकण प्राप्त केले. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अजूनही सीसीआय किंवा कापूस पणन महासंघाकडे विकल्या न गेल्याचा फुगीव आकडा जिल्ह्यात कायम असल्याने वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस शिल्लक आहे काय या बाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार असले तरी आतापर्यंत टोकण धारक २,१७४ शेतकऱ्यांनी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस न विकता थेट खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात कापूस विकल्याचे पुढे आले आहे. तशी नोंदणी सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.कृषी अधीक्षक कुंभकर्णी झोपेतच?शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून कृषी विभागाकडे बघितले जाते. परंतु, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कृषी विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या सर्वेक्षणात कृषी विभागाचेही सहकार्य क्रमप्राप्त असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याची ओरड होत आहे.सर्वेक्षणात हिंगणघाट तालुका अव्वलआतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ७९२ शेतकºयांच्या घरी भेटी देऊन कापूस विकला किंवा विकण्याचे शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील ३ हजार ३००, समुद्रपूर १ हजार ६४०, वर्धा २ हजार ५४९, देवळी १ हजार ५५, कारंजा (घा.) ७०६, आर्वी ७१०, सेलू २ हजार ७ तर आष्टी तालुक्यातील ८२५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जात नाही. त्यामुळे त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला. सरकारने अशा मस्तवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावत विचारणा केली पाहिजे. शिवाय त्यांची तातडीने बदली केली पाहिजे; पण मुख्यमंत्रीच सध्या पावरहीन आहेत.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य, शेतकरी आत्महत्याग्रस्त समिती, वर्धा.

टॅग्स :cottonकापूस