टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी

By Admin | Updated: October 1, 2016 23:40 IST2016-10-01T18:30:28+5:302016-10-01T23:40:20+5:30

वर्धा-आर्वी मार्गावरील बेढोणा घाटात टँकर व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील चालक व वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले.

21 passengers injured in tanker bus accident | टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी

टँकर-बस अपघातात २१ प्रवासी जखमी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
वर्धा, दि. १ -   वर्धा-आर्वी मार्गावरील बेढोणा घाटात टँकर व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बसमधील चालक व वाहकासह २१ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडला.
उत्तम किसन मेश्राम (७०) रा. वलगाव खुर्द, ता. मोर्शी, लिलाधर मनोहर गजभिये (६०), गंगाधर उत्तम मेश्राम (४०), वच्छलाबाई महादेव कवाडे (६०)रा. वलगाव खुर्द, मुस्तफा खान हैदरखान (४०) रा. साईनगर, आर्वी, रऊफ खान पठाण (बसचालक) रा. हिंगणघाट, रामभाऊ रामटेके, पुरूषोत्तम महादेव इरखेडे (६५) रा. आकोली, भगती धोंडबा मरगडे (६५) रा. आष्टी, रेखा वासुदेव नवलकर (३५) रा. देवळी, दयासिंग बलवासिंग जुने (५०) रा. तळेगाव, भीमराव महादेव ढवळे (६८), कविता अरविंद गुजरकर (४०), लक्ष्मीबाई भीमराव ढवळे (६५), अश्विनी अरविंद गुजरकर (३२) रा. वर्धा, हरिराम तुकाराम खवसे (६७) रा. माणिकवाडा, ता. आष्टी, आनंदी अमृतराव बुलाखे (२९) रा. राजापूर ता. आर्वी अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस सुत्रानुसार, हिंगणघाट डेपोची एमएच ४० एन ८५०७ क्रमांकाची बस हिंगणघाटवरून मोर्शीला येत होती. दरम्यान बेढोणा घाटात आर्वीवरून वर्धेला जाणाऱ्या जीजे १५ वायवाय ८९६० क्रमांकाच्या भरधाव टँकरने बसला समोरासमोर
धडक दिली. यात बसमधील चालक रऊफ खान पठाण रा. हिंगणघाटसह वाहक व बसमधील प्रवासी या अपघातात जखमी झाले. अपघातातील जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी तातडीने आर्वी उपजिल्हा रूग्णालय येथे भरती करण्यात आले. 
जखमीवर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक नंदकिशोर कोल्हे, डॉ. खरात, डॉ. चव्हाण, डॉ. तळवेकर, परिचारिका दीपाली आकोलकर, भारती चरडे, वंदना उघडे, शहा, मंदा राठोड, ढाले, रामटेके, विक्की सारसर याच्यासह जखमींवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू उपचार करीत आहे. या अपघाताची नोंद आर्वी ठाण्यात करण्यात आली.

Web Title: 21 passengers injured in tanker bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.