शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

जिल्ह्यातील २ हजार ७३१ शेतकऱ्यांना मिळाले ठिबक, तुषार संचाचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

आठही तालुक्यातील ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या संचाची मागणी केली होती.  कागदपत्राची पूर्तता न करणे, प्राथमिक मंजुरी न घेणे, ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सादर न करणे, दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त देयक सादर करणे व अपूर्ण माहिती देणे आदी कारणांमुळे २ हजार ९०२ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे उर्वरित २ हजार ७३१ शेतकऱ्यांनी संचाची उचल केली असून त्यांना शासनाकडून जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कमही अदा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउद्दिष्ट झालेय पूर्ण : सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा

 श्रीकांत तोटे    लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : शेतऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याकरिता सिंचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि पाण्याचीही बचत व्हावी, याकरिता शासनाकडून तुषार व ठिंबक सिचंनाकरिता अनुदान दिले जाते.  जिल्ह्यात सन २०१९- २० या वर्षाकरिता तुषार व ठिंबक सिंचन योजनेकरिता ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यातील  २ हजार ७३१ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून त्या सर्वांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.आठही तालुक्यातील ५ हजार ६३३ शेतकऱ्यांनी ठिंबक व तुषार सिंचनाच्या संचाची मागणी केली होती.  कागदपत्राची पूर्तता न करणे, प्राथमिक मंजुरी न घेणे, ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सादर न करणे, दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त देयक सादर करणे व अपूर्ण माहिती देणे आदी कारणांमुळे २ हजार ९०२ शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे उर्वरित २ हजार ७३१ शेतकऱ्यांनी संचाची उचल केली असून त्यांना शासनाकडून जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कमही अदा करण्यात आली आहे.

५५% मिळते अनुदान

अल्पभूधारक शेतकऱ्याला ५५ टक्के तर पाच एकरावरील ४५ टक्के अनुदान दिले जाते. तुषार सिंचनासाठी अनुदान राशी ही ५५ टक्केनुसार १२ हजार ४५ रुपये तर ४५ टक्केनुसार ९ हजार ८५५ इतकी दिली जाते. ठिंबक सिंचनासाठी कमीत कमी ७ हजार १३३ तर जास्तीत जास्त २ लाख ९९ हजार ८५० रुपये दिली जाते.

अनुदान मिळण्यात आहेत अडचणीबाजारात एक तुषार संच २९ हजार ते ३१ हजार ५०० रुपयांपर्यंत मिळतो. परंतु केंद्रीय समितीने २९ हजार ९०० रुपयांची शिफारस केली आहे. त्यामुहे जवळपास साडे नऊ हजार रुपयांपर्यंत तफावत दिसून येते. याचा भार शेतकऱ्यांवर पडतो. बऱ्याच ठिकाणी तलाठी किंवा कृषी कार्यालयाकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

यावर्षी मार्चमध्ये मी माझ्या शेतात ठिबक सिंचन संच घेतला असून त्या आधारे उत्पन्नही घेत आहे. मात्र अद्याप पर्यंत अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली नाही. याबाबत तलाठ्यांना विचारणा करुनही टाळाटाळ होत आहे.- सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे

२०१९-२० वर्षाकिरता तालुक्यातील मागणीची पूर्तता झाली असून सर्वांच्या खात्यात अनुदानाची राशी पोहोचलेली आहे. २०२०-२१ साठी कुठलाही आर्थिक लक्षांक अद्यापपर्यंत शासनाकडून आलेला नाही. व्ही.टी. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी