१९५ शाळा आल्या ‘स्कूल मॅपिंग’मध्ये
By Admin | Updated: September 22, 2014 23:24 IST2014-09-22T23:24:20+5:302014-09-22T23:24:20+5:30
शाळांची भौतिक स्थिती व तालुक्यातून वा जिल्हास्थळावरून शाळेच्या अंतराची माहिती करण्याकरिता ‘स्कूल मॅपिंग’ करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला होता. या मॅपिंगनुसार समुद्रपूर

१९५ शाळा आल्या ‘स्कूल मॅपिंग’मध्ये
समुद्रपूर : शाळांची भौतिक स्थिती व तालुक्यातून वा जिल्हास्थळावरून शाळेच्या अंतराची माहिती करण्याकरिता ‘स्कूल मॅपिंग’ करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला होता. या मॅपिंगनुसार समुद्रपूर तालुक्यातील १९५ शाळा जोडण्यात आल्या आहेत. पंचायत समितीतील संपूर्ण शाळा स्कूल मॅपिंगने जोडणारा जिल्ह्यातील हा पहिला तालुका असल्याची माहिती विस्तार अधिकारी राठोड यांनी दिली.
जिल्ह्यातील शाळांची संपूर्ण माहिती एकाच क्षणी मिळावी, शिवाय त्यांच्या भौतिक विकासाबाबत असलेली माहिती मिळावी याकरिता शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शाळा स्कूल मॅपिंगने जोडण्यात आल्या. या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सर्व माहिती गोळा करीत तालुक्यातील १९५ शाळा स्कूल मॅपिंगने जोडल्या आहेत.
या पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण शाळांची माहिती एका क्षणात राज्यात शिक्षण विभागाच्यावतीने वा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्यावतीने पाहणी कल्यास ती कळणार आहे.
कोणत्या शाळेची इमारत पूर्ण झाली आहे. कोणत्या शाळेला इमारतीची गरज आहे. कोणती शाळा किती अंतरावर आहे. याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर कळणार आहे. या शाळा स्कूल मॉपिंगने जोडण्यात आल्या असल्याने त्यांचा विकास साधणे सोपे होईल. शाळांचा भौतिक विकास साधण्याकरिता ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)