१,९४४ व्यक्ती देणार सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकट ओढवताच पुढे ढकलण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार, १४ मार्च रोजी ...

१,९४४ व्यक्ती देणार सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकट ओढवताच पुढे ढकलण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार, १४ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण सात परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली असून, परीक्षेसाठीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी वर्धा शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय, केसरीमल कन्या शाळा, सुशल हिम्मतसिंगका विद्यालय तसेच पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी विद्यालय ही परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत. या सात परीक्षा केंद्रांवरून रविवार, १४ मार्चला एकूण १ हजार ९४४ व्यक्ती राज्य सेवा पूर्व परीक्षा देणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अधीक्षक महेंद्र सूर्यवंशी, अव्वल कारकून माया चावडीपांडे, अजय लाडेकर, पवन मडावी यांनी पूर्ण केली आहे. कोरोना संकटा ओढावल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता सात केंद्रांवरून ही परीक्षा होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे करावे लागेल पालन
केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक परीक्षार्थ्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
सात केंद्र प्रमुखांसह पर्यवेक्षक अन् सर्वेक्षक देणार सेवा
रविवार, १४ मार्च रोजी होऊ घातलेल्या परीक्षा पारदर्शी व्हावी म्हणून सात केंद्र प्रमुखांसह २९ पर्यवेक्षक, ८९ सर्वेक्षक, १४ लिपीक, २१ शिपाई सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले.