जिल्ह्यात १८.३९ टक्केच जलसाठा
By Admin | Updated: July 12, 2014 01:37 IST2014-07-12T01:37:39+5:302014-07-12T01:37:39+5:30
जुलै महिना अर्ध्यावर आला आहे. पावसाचे चारही नक्षत्र कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या; मात्र त्याला पाऊस आला असे म्हणता येणार नाही.

जिल्ह्यात १८.३९ टक्केच जलसाठा
रूपेश खैरी वर्धा
जुलै महिना अर्ध्यावर आला आहे. पावसाचे चारही नक्षत्र कोरडे जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या; मात्र त्याला पाऊस आला असे म्हणता येणार नाही. पावसाच्या दडीने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस आला नसल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांचीही पातळी खाली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या छोट्या मोठ्या अशा एकूण १३ जलसाठ्यात सरासरी १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील मदन (उन्नई) येथील जलसाठा पूरता आटला आहे. यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आहेत. या दिवसात कुठेच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६१४.२ मिलीमिटर पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणित तर बिघडलेच शिवाय येत्या दिवसात पाऊस आला नाही सर्वच गणित बिघडणार असल्याचे चित्र आहे. पाऊस येत नसल्याने जलाशयातील पाण्याची पातळी खालावत आहे. गत वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जलाशये ओव्हरफ्लो झाली असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात त्या जलसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सध्या जलसाठ्या असलेल्या पाण्यामुळे टंचाईसदृृश्य स्थिती नसली तरी येत्या दिवसात पाण्याची टंचाई भासणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील तीन धरणातील जलसाठा दोन दलघमी मिटरच्या आत आले आहे. यामुळे काही दिवसात पाऊस आला नाही तर या धरणातील पाणीही संपण्याच्या मार्गावर आले आहे. यात पंचधरा, पोथरा, डोंगरगाव या धरणांचा समावेश आहे. या धरणातून शेतीकरिता पाणी सोडण्यात येते.