१७ तासात मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:45 PM2019-07-14T23:45:44+5:302019-07-14T23:46:24+5:30

प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

In 17 hours the slaughters killed the killers | १७ तासात मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

१७ तासात मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देअजय वाणी हत्याकांड : दोघांनाही बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
येथील तेलघाणी फैल परिसरात आषाढी एकादशीच्या दिवशी १२ जुलैला अजय उर्फ जय वाणी याची प्रेयसीच्या भावाने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यापासून मानेपर्यंत धारदार शस्त्राचे चार घाव तर खांद्यापासून हातापर्यंत तीन असे जवळपास सात घाव ३ ते ४ इंचापर्यंत खोल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींनी तलवारीचा किंवा सत्तुराचा वापर केला असावा, असा अंदाज पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. मृत अजय व आरोपीच्या बहिणीची जुनीच ओळख होती.
त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुटुंबियांनाही माहिती होती. प्रेयसीच्या भावाने मृत अजयला तिच्यापासून दूर राहण्याचे वारंवार सांगितले होते. परंतु अजयने याकडे कानाडोळा केल्यानेच हा हत्याकांड घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षय माहुरे व आशिष लोणकर या दोघांनाही मंगरुळ (दस्तगीर) येथून अटक केली. आरोपी लोणकर आणि मृतक हे दोघेही डीजेचा व्यवसाय करायचे. हत्येनंतर तेलघाणी फैल परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. परंतु पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि नागरिकांच्या मध्यस्तीने हा तणाव शांत करण्यात यश आले. मृत अजयच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: In 17 hours the slaughters killed the killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.