शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

१७ पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त

By admin | Updated: May 24, 2017 00:53 IST

आर्वी, हिंगणघाट, सेलू व समुद्रपूर तालुक्यात पालकमंत्री पांदण अतिक्रमण मुक्त रस्ते योजनेंतर्गत २० दिवसांत २५ किमी लांबीचे १७ पांदण रस्ते

पालकमंत्री पांदण योजना : चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आर्वी, हिंगणघाट, सेलू व समुद्रपूर तालुक्यात पालकमंत्री पांदण अतिक्रमण मुक्त रस्ते योजनेंतर्गत २० दिवसांत २५ किमी लांबीचे १७ पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी दूर होऊन त्यांना वहिवाटीसाठी फायदा होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री पांदण अतिक्रमणमुक्त रस्ते योजनेंतर्गत अतिक्रमीत झालेले पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी जिल्ह्याला सहा जेसीबी प्राप्त झालेले आहेत. या जेसीबीमार्फत जिल्ह्यातील अतिक्रमीत पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आर्वी, हिंगणघाट, सेलू व समुद्रपूर तालुक्यातील अतिक्रमीत पांदण रस्ते मोकळे करण्याचे काम प्रगती पथावर आहे. वर्धा, देवळी, आष्टी व कारंजा तालुक्यातील कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पांदण रस्ते मोकळे करून घ्यावेत. यासाठी आपल्या योजना या मोबाईल अ‍ॅपवर तसेच संकेत स्थळावर आॅनलाईन अर्ज करावयाचे आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी नवाल यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेती वहिवाटीचा प्रश्न निकाली ग्रामीण भागातील बहुतांश पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतीची वहिवाट धोक्यात आली होती. शिवाय अनेक पांदण रस्त्यांची दुरवस्थाही झाली होती. आता यासाठी पालकमंत्री पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त योजना राबविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना पांदण रस्ते मोकळे करून घेता येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी थोडीफार आर्थिक तरतूद करावी लागत असली तरी शेतीच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली निघत असल्याने प्रतिसाद मिळत आहे. आमच्या गावात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे; पण रस्त्याच्या अडचणीमुळे दोन वर्षांपूर्वी माझ्या शेतातील ऊस कारखान्यात नेता आला नाही. ऊस शेतातच वाळल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पांदण रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती. पांदण अतिक्रमणमुक्त रस्ता योजनेतून शासनाने जेसीबी उपलब्ध करून दिला आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने पांदण रस्ता मोकळा केला. यावर्षी ट्रॅक्टर रस्त्यात फसणार नाही. तसेच मालाची ने-आण करण्यासाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तीन गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. - नारायण पोटे, अल्पभूधारक शेतकरी, दहेगाव (मुस्तफा).