१७ ट्रॅक्टरनिर्माल्याची विल्हेवाट

By Admin | Updated: September 9, 2014 23:52 IST2014-09-09T23:52:45+5:302014-09-09T23:52:45+5:30

गणेश मुर्तीचे विसर्जन करताना निर्माल्यसुध्दा नदीच्या पात्रात सोडले जाते. यामुळे पाण्याचे प्रदुषण होते. ते टाळण्यासाठी जि.प.च्या वतीने निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकण्यास पुर्णत: मनाई करण्यात

17 Detective of tractor | १७ ट्रॅक्टरनिर्माल्याची विल्हेवाट

१७ ट्रॅक्टरनिर्माल्याची विल्हेवाट

वर्धा: गणेश मुर्तीचे विसर्जन करताना निर्माल्यसुध्दा नदीच्या पात्रात सोडले जाते. यामुळे पाण्याचे प्रदुषण होते. ते टाळण्यासाठी जि.प.च्या वतीने निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकण्यास पुर्णत: मनाई करण्यात आली होती. या अंतर्गत पवनार येथील विसर्जन घाटावर एकूण १७ ट्रॅक्टर निर्माल्य गोळा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेसोबतच वर्धा जिल्हा सुजल निर्मल तसेच पाणी स्वच्छता अभियानांतर्गत विसर्जनाच्यावेळी निर्माल्य गोळा करण्यासाठी पवनार येथील घाटांवर समाजकार्य महाविद्यालयाच्या २० स्वयंसेवकासोबतच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबविला आहे.
पवनार येथील कृत्रिम निर्माल्य विसर्जन टँकमध्ये गोळा झालेले निर्माल्य गावाबाहेर नेण्यास ट्रॅक्टरची व्यवस्था होती. दोन्ही घाटावरील निर्माल्याचे एकूण दोन दिवसात १७ ट्रॅक्टर निर्माल्य गोळा करण्यात आले. सदरील कार्य करण्याकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे महेश डोईजोड, सचिन खाडे, राहुल चावके, संपदा अर्धापुरकर, विनोद खोब्रागडे सतीश लांजेवार, योगीता धोपटे, अरविंद बलवीर तर बांधकाम विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तर ग्रामपंचायत पवनारच्यावतीने सरपंच अजय गांडोळे, ग्राम विकास अधिकारी रमेश तेलरांधे, राजेंद्र उराडे, देविदास गुरनुले, गणेश हजारे, रामा मसराम, राजु काकडे, शत्रुघ्न नगराळे, दिनकर दांडेकर यांच्यासह पोलीस ठाण्याचयावतीने विशेष दक्षता पथक नेमण्यात आले होते.
सीईओ चौधरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)चे राजेंद्र भुयार यांनीही सुजल वर्धा, निर्मल वर्धा संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्यास सहकार्य केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, वर्धेचे उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार राहुल सारंग, वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ऐ. व्ही. कीटे, सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी या मोहिमेत सहभाग घेवून नागरिकांना मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

Web Title: 17 Detective of tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.