१६ वर्षांखालील १६०१, १६ ते ३५ वयोगटातील १०१०८ रुग्ण, मात्र, अद्याप कोरोना लसीकरण नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:15+5:30

गतवर्षीपासून देशभरासह राज्यात  कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मारला आहे. ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. 

1601 under 16 years, 10108 patients in the age group of 16 to 35 years, however, corona vaccination has not been done yet! | १६ वर्षांखालील १६०१, १६ ते ३५ वयोगटातील १०१०८ रुग्ण, मात्र, अद्याप कोरोना लसीकरण नाही !

१६ वर्षांखालील १६०१, १६ ते ३५ वयोगटातील १०१०८ रुग्ण, मात्र, अद्याप कोरोना लसीकरण नाही !

ठळक मुद्दे१८ वर्षांवरील सर्वांना मिळेल १ मे पासून लस : १६ वर्षांखालील मुलांना प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ वर्षांखालील तसेच १६ ते ३५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने १६ वर्षांखालील मुले आणि  १६ ते ३५ वयोगटातील नागरिकांनाही कवेत घेतल्याचे चित्र आहे.
गतवर्षीपासून देशभरासह राज्यात  कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मारला आहे. ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. 
मात्र, १६ वर्षांखालील  मुले आणि १६ ते ३५ वर्षे वयोगटातील रुग्णांना अद्याप लसीकरण नाही.  कोरोनावर मात करण्यासाठी १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६०१ रुग्ण आहेत. १६ ते ३५  वयोगटातील १० हजार १०८ तर १६ ते ४५  वयोगटातील १५ हजार ७९९ रुग्ण आहेत. 
केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांनाच १ मे पासून लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मात्र, १६ वर्षांखालील आणि त्यावरील वयोगटातील मुलांना कधी लस दिली जाणार हे अद्याप सांगता येणार नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

१६ वर्षांखालील १६०१ रुग्ण; मात्र,लसच उपलब्ध नाही
 कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले.
 कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया  सुरू करण्यात आली. अनेकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
 १८ वर्षांवरील सर्वांनाच १ मे पासून लस देण्यात येणार आहे. मात्र, १६ वर्षांखालील तसेच त्यावरील वयोगटातील मुलांना लसीकरणाबाबत शासनाकडून नियोजन झालेले नाही.

४५ पेक्षा कमी वयाचे १० हजार १०८ रुग्ण; मात्र, लसीकरण सुरू नाही
 पहिल्या टप्प्यात आरोग्य, महसूल विभागातील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना लसीकरण करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले असून अद्याप ही प्रक्रिया सुरूच आहे.
 १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे लवकरच ४५ पेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे.

 

Web Title: 1601 under 16 years, 10108 patients in the age group of 16 to 35 years, however, corona vaccination has not been done yet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.