शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

राष्ट्रीय लोक अदालतीत १६०१ प्रकरणे तडजोडीने निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:33 IST

५.२३ कोटी तडजोड शुल्क केले जमा : कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये, तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत तब्बल १७ हजार २८० प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील एक हजार ६०१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहे. यांच्याकडून तडजोड शुल्कापोटी ५ कोटी २३ लाख रुपये शुल्क न्यायालयात जमा करण्यात आले आहे. 

न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले प्रकरणे, तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते, तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना होते. यात वेळ अन् पैशांची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतीमुळे पक्षकारांना मिळते. असे विचार न्यायाधीश संजय भारूका, तसेच जिल्हा न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. जिल्हा न्यायाधीश जे. ए. पेडगांवकर, यांनी राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण अधिक राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली ३ हजार ८४७ प्रकरणे, तसेच वाहतूक, आरटीओ व इतर असे एकूण १७ हजार २८० प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. यात १ हजार ६०१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यात न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार २७२ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. यासाठी तडजोड शुल्क ३ तीन कोटी ४६ लाख १५ हजार १०५ रुपये न्यायालयात जमा करण्यात आले.

कौटुंबिक हिंसाचाराच्या ८ प्रकरणांत जुळली मने जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांपैकी आठ प्रकरणांत नवरा-बायकोमध्ये असलेल्या वादाचा या लोक अदालतीमध्ये निपटारा करण्यात यश आले. त्यांनी हसत-खेळत आपले संसार करण्याचे ठरविलेले आहे. त्याच प्रमाणे वाद दाखल पूर्व प्रकरणांपैकी ३२९ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढले.

टॅग्स :wardha-acवर्धा